जिजाऊ माँसाहेबांच्या जयंती निमित्तानं ‘सिंदखेडच्या वाटनं गाऊ जिजाऊचं गाणं’ प्रदर्शित

परभणी : राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या दोन्ही महापुरुषांना घडवण्याचं काम केलं. शिवाजी महाराजांचं लढाई, युद्धनिती, शिक्षण हे राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली पार पडलं. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीची प्रेरणा आणि संकल्पना माँ जिजाऊ यांच्याकडूनच घेतली. 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊ यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात येते. दरम्यान, परभणीतील गायकांनी जिजाऊंच्या शौर्याची गाथा गाण्यातून सादर करण्याचा प्रयत्न केलाय. जिल्ह्यातील कलाकारांनी राजमाता जिजाऊ (Jijau Song) यांच्या जीवनावर ‘शिंदखेडच्या वाटनं गाऊ जिजाऊचं गाणं’, हे गायलेलं प्रदर्शित केलं आहे.

जिजाऊंच्या या नव्या गाण्यात चार कलाकार एकत्र येत जिजाऊंच्या शौर्याची गाथा गात असताना दिसत आहे. माहेरच्या वाटेवरुन जाताना त्यांना शिंदखेडच्या वाटेची आठवण होते, अशी भावना महिला या गाण्यातून महिला कलाकार महिला व्यक्त करताना दिसत आहेत. कलाकारांनी जिजाऊ प्रती असलेली आपली भावना आशयपूर्वी काव्यातून मांडली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला हे गाण रसिकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

राजमाता जिजाऊंचं व्यक्तीमत्व इतिहासकार, कादंबरीकार, कवी आणि गीतकारांना प्रेरित करणार आहे. याचं भावनेतून प्रा. डॉ. कल्याण कदम यांनी हे गीत लिहिलं आणि संगीतबद्ध केलं आहे. नव्या दमाचा मधुर स्वर लाभेली गायिका संगीता मुळे यांनी हे गीत गायलंय. या गीताचा सुंदर व्हिडिओ यूट्यबरवर अपलोड करण्यात आलाय. हे गाणं वैष्णवी अंभोरे, योगिता राऊत, अनुजा मुकडे आणि किरण मुळे या कलाकारांवर चित्रीत करण्यात आलं असून याचं कलादिग्दर्शन बाबा डांगे यांनी केलंय. तर अमोल मोरे, माऊली पाथरकर, सुभाष जोगदंड या वाद्यवृंदांनी या गाण्याला सजवलंय. विशेष म्हणजे परभणीतील हरिष आणि प्रथम शहाणे यांनी प्रफुल्ल म्यूझिक स्टुडिओत याचं रेकॉर्डिंग केलंय. नागनाथ महाविद्यालय, औंढा नागनाथ येथील प्राचार्य डॉ. विजय कानवटे यांच्या प्रेरणेतून तयार झालेल्या या गीताची निर्मिती खोपा क्रिएशनच्या आशा कल्याण कदम यांनी केली आहे.