अखेर खातेवाटप जाहीर: बघा कोणत्या खात्याचा कोण मंत्री? एका क्लिक वर

राज्य सरकारचा प्रलंबित असलेला खातेवाटपाचा विषय अखेर मार्गी लागला आहे. हिवाळी अधिवेशनाअगोदर विस्तारीत कॅबिनेटचा शपथविधी झाला होता. मात्र खातेवाटप झाले नव्हेत. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खातेवाटप झाले असून त्याची यादी पुढीलप्रमाणे आहेत.

  • मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस : गृह, ऊर्जा (नवीकरणीय ऊर्जा विभाग वगळून) विधी व न्याय, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय.
  • उप मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे : नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम)
  • उप मुख्यमंत्री श्री. अजित पवार : वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क.

मंत्री
श्री. चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
श्री. राधाकृष्ण विखे पाटील : जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)
श्री. हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
श्री. चंद्रकांतदादा पाटील : उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य
श्री. गिरीश महाजन : जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन.
श्री. गणेश नाईक : वने
श्री. गुलाबराव पाटील: पाणी पुरवठा आणि स्वच्छता.
श्री. दादाजी भुसे: शालेय शिक्षण.
श्री. संजय राठोड : मृद आणि जलसंधारण.
श्री. धनंजय मुंडे : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण.
श्री. मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता.
श्री. उदय सामंत : उद्योग, मराठी भाषा
श्री. जयकुमार रावल : पणन, राजशिष्टाचार.
श्रीमती पंकजा मुंडे : पर्यावरण आणि वातावरणीय बदल, पशुसंवर्धन.
श्री. अतुल सावे : इतर मागास, बहूजन कल्याण, दूग्ध व्यवसाय विकास, नवीकरणीय ऊर्जा
श्री अशोक उईके : आदिवासी विकास.
श्री शंभुराज देसाई : पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण.
श्री. आशिष शेलार : माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य.
श्री. दत्तात्रय भरणे : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
कु. आदिती तटकरे : महिला व बालविकास.
श्री. शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम वगळून).
श्री. माणिकराव कोकाटे : कृषी.
श्री. जयकुमार गोरे : ग्रामविकास आणि पंचायतराज.
श्री. नरहरी झिरवळ : अन्न व औषध प्रशासन आणि विशेष सहाय्य.
श्री. संजय सावकारे : वस्त्रोद्योग.
श्री. संजय शिरसाट : सामाजिक न्याय.
श्री. प्रताप सरनाईक : परिवहन
श्री. भरत गोगावले : रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास.
श्री. मकरंद जाधव-पाटील : मदत व पुनर्वसन.
श्री. नितेश राणे : मत्स्य व्यवसाय, बंदरे.
श्री. आकाश फुंडकर : कामगार.
श्री. बाबासाहेब पाटील : सहकार.
श्री. प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण.

राज्यमंत्री –
श्री. आशिष जयस्वाल : वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार,
श्रीमती माधुरी मिसाळ : नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ.
डॉ पंकज भोयार : गृह ( ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म.
श्रीमती मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम).
श्री. इंद्रनील नाईक : उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, पर्यटन, मृदू आणि जलसंधारण.
श्री. योगेश कदम : गृह ( शहरी) महसूल, ग्रामविकास आणि पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन.