Horoscope today 29 October 2024: धनत्रयोदशीला कोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? तुमच्यावर असणार का लक्ष्मीची कृपा? वाचा राशिभविष्य!

आज २९ ऑक्टोबर असून धनत्रयोदशी आहे. धनत्रयोदशीपासून दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात केली जाते. यादिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. या दिवशी खरेदी करणे शुभ मानले जाते. ज्योतिष गणनेनुसार, २९ ऑक्टोबरचा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असणार?

मेष राशी

रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता. संवाध साधताना काळजी घ्या. मुलांकडून आनंदाजी बातमी मिळू शकते. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. घर-कुटुंबात धार्मिक कार्य होतील. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता.

वृषभ राशी

तुमचा आत्मविश्वास वाढेल. पण मन अशांत राहील. आळशी होऊ शकता. आरोग्याची काळजी घ्या. नोकरीत प्रगती होण्याची शक्यता. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. खर्चात वाढ देखील होऊ शकते. प्रवासाचा योग बनेल. मित्रांचे सहकार्य मिळू शकते.

मिथुन राशी

नोकरी-धंद्यात यश मिळेल. मेहनत अधिक घ्यावी लागू शकते. नोकरीसाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. नवीन वाहन खरेदी करू शकता. मित्रांचे सहकार्य मिळेल.

कर्क राशी

आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. खूप धावपळ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वादविवादापासून सावध राहा. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यशस्वी होऊ शकाल.

सिंह राशी

तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते. कार्यक्षेत्रात यश मिळेल. बौद्धिक कार्यामुळे धनप्राप्ती होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. संवाद साधताना काळजी घ्या. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

कन्या राशी

कार्यक्षेत्रात प्रगती होईल. परदेशात जाण्याचा योग बनू शकतो. मन प्रसन्न राहील. आत्मविश्वासात कमी राहू शकते. पार्टनरसोबत वैचारिक मतभेद होऊ शकतात. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. घर-कुटुंबात धार्मिक कार्य होतील.

तुळ राशी

नोकरीत प्रगती होण्याची शक्यता. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. एखाद्या मित्राचे सहकार्य मिळेल. वडिलांचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील समस्यांमुळे त्रस्त होऊ शकता. मानसिक तणाव राहील. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक राशी

मानसिक आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबाची साथ मिळेल. खर्चात वाढ होऊ शकते. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. एखाद्या संपत्तीमुळे उत्पन्नात वाढ होऊ शकते. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.

धनु राशी

रागावर नियंत्रण ठेवा. मित्राच्या सहकार्यामुळे गुंतवणूक करू शकता. वडिलांकडून आर्थिक मदत मिळू शकते. आरोग्याची काळजी घ्या. मन अशांत राहील. उच्च शिक्षणासाठी परदेशात प्रवासाचा योग बनेल.

मकर राशी

एखाद्या मित्राशी वादविवाद करू नका. आरोग्याची काळजी घ्या. अनावश्यक खर्च वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता. नोकरीमुळे प्रवासाचा योग बनेल.

कुंभ राशी

मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. नोकरीत प्रगती होऊ शकते. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकते. भौतिक सुखात वाढ होईल.

मीन राशी

मन शांत किंवा प्रसन्न राहील. कला किंवा संगितात रुची वाढू शकते. संवाद साधताना काळजी घ्या. शैक्षणिक कार्यात यशस्वी व्हाल. कार्यक्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. पार्टनरचे सहकार्य मिळेल.