Horoscope today 28 October 2024: आज वसुबारस असून दिवाळीच्या सणाला सुरुवात, जाणून घ्या तुमच्या राशीच्या नशिबात काय बदलणार?

आज २८ ऑक्टोबर सोमवार असून रमा एकादशी, गोवत्स द्वादशी आणि वसुबारस आहे. आज गाय आणि वासराची पूजा केली जाईल. महाराष्ट्रातील अनेक भागात आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होईल. तसेच, आज पूर्वा नक्षत्र असून ब्रह्म योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असणार?

मेष – मुलांसोबत प्रवास करा. उच्च शिक्षणासाठी घेतलेले निर्णय पूर्ण होऊ शकतील. व्यवसाय किंवा नोकरीत उत्तम प्रगती करा.

वृषभ – भरपूर कामे करून थकवा जाणवेल. आपल्याला विश्रांतीची गरज आहे. जेणेकरून पुढील निर्णय घेण्यास आपण तत्पर असाल.

मिथून – स्नेही लोकं भेटतील. जोडीदारासोबत प्रवासाचे योग असू शकतात. भागीदारी संदर्भातील कामांमध्ये यश मिळेल.

कर्क – वाहने सावकाश चालवावित कारण अपघाती काळ आहे. कष्ट करावे लागतील. पैशांची काळजी घ्या.

सिंह – तीर्थयात्रा किंवा मनाच्या प्रसन्नतेसाठी प्रवास होऊ शकतो. तुम्हाला विश्रांती घेण्याची गरज आहे. कारण पुढे अनेक जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागणार आहेत.

कन्या – कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस आहे. इष्टदेवतेची आराधना करा ज्यामुळे मन स्वस्थ राहील.

तूळ – वरिष्ठ लोकांची भेट होऊ शकते. ते नाराज होतील असे काही कार्ये करू नका. अनपेक्षित कार्ये घडू शकतात याची दक्षता घ्यावी व जागरूक रहावे. तसेच अधिक विचारही करू नये.

वृश्चिक – मिळालेले धन लगेच खर्च करण्याची इच्छा होऊ शकते. असे केल्याने पुढे लागणारी आवश्यकता त्रास देईल त्यामुळे अनावश्यक गोष्टींवर खर्च करू नका.

धनु – आरोग्यात चांगली सुधारणा होईल. उत्तम उर्जा जाणवेल. अभ्यासात मन लागेल. उर्वरित कार्ये पूर्ण होऊ शकतील. तसेच प्रवास देखील चांगला होईल.

मकर – अधिक प्रवासाने थकवा जाणवू शकतो. आरोग्याच्या समस्या वाढतील. अशा अवस्थेत चिडचिड देखील होऊ शकते. मनाची स्थिरता महत्वाची आहे. काही काळ विश्रांती घ्यावी. कुटुंबातील लोकांना वेळ द्यावा.

कुंभ – जवळचे प्रवास होतील. बंधु -भगिनींशी संवाद साधाल. त्यांच्यासह आनंद साजरा कराल. आपल्या अधिकाराचा उत्तम उपयोग करून घ्याल.

मीन – आज कार्ये करण्याची इच्छा होणार नाही. घरातच बसून राहावे. विश्रांती घ्यावी असे वाटेल. प्रचंड आळस निर्माण होऊ शकतो. अशावेळी अध्यात्माचे चिंतन करा.