आज २७ ऑक्टोबर रविवार असून मघा नक्षत्र आहे. ब्रह्मा योग असून बव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे काही राशींना चांगला फायदा होईल. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी रविवारचा दिवस कसा असणार?
मेष
आज उपासनेसाठी दिवस चांगला आहे. एकादशीसाठी विशेष विष्णू उपासना फलदायी ठरू शकतो. मनासारख्या गोष्टी घडतील. पैशाची गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
वृषभ
प्रॉपर्टीशी निगडित व्यवहार पार पडू शकतील. शेतीवाडी मध्ये विशेष रस निर्माण होईल. घरातील गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल. मनस्वास्थ्य बरे राहील.
मिथुन
छोट्या प्रवासाच्या दृष्टीने दिवस चांगला आहे. रेंगाळत राहिलेले पत्र व्यवहार मार्गी लागतील. दळणवळणांमधून व्यवसायाच्या नवीन संधी प्राप्त होण्याची शक्यता.
कर्क
जोडीदाराच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबीयांचा सल्ला आज महत्त्वाचा ठरू शकतो. “एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ” हे लक्षात घ्या आणि पुढे चला.
सिंह
तुमच्यामधील कणखरपणा आज अजून वाढेल. आत्मविश्वासाने आयुष्यातील नव्या गोष्टी पादाक्रांत कराल. दिवाळीच्या उंबरठ्यावर काही नवे संकल्प करून त्या दृष्टीने पावले उचला.
कन्या
इतरांकडे लक्ष न देता आपण आपला कार्यभाग साधणे हे जास्त बरे राहील. मनस्ताप वाढवून घेतल्यास तो वाढेलच. खर्च अटळ आहेत पण हिशोबही ठेवावा लागेल हे लक्षात घ्या.
तूळ
यशाच्या नवीन वाटा आज चोखाळाल. केलेल्या गोष्टींचे लाभच पदरात पडू शकतील. नातेवाईकांमध्ये आपला आज वेगळाच मान आणि दर्जा असेल. दिवस सुखाचा जाईल.
वृश्चिक
“थेंबे थेंबे तळे साचे” असा आजचा दिवस आहे. मुंगीच्या पावलाने का होईना कामाचे यश मिळण्याची शक्यता. खंबीरपणे करिअर विषयी निर्णय घ्या. सहकाऱ्यांच्या सहकार्य बरोबर घेऊन गेल्यास जास्त बरे राहील.
धनु
सद्गुरूंची विशेष कृपा आज आपल्यावर राहणार आहे. मोठे प्रवास घडतील. उपासनेच्या दृष्टीने दिवस चांगला आहे.
मकर
काळ्या धनापासून विशेष काळजी घ्यावी. दिवस कटकटीचा राहील. आपले शारीरिक आणि मानसिक अवस्था जपावे लागेल. समोरच्या व्यक्तीशी दोन हात करताना नाकी नऊ येतील.
कुंभ
व्यवसायाचा नवीन टप्पा येईल.जुन्या गोष्टी नव्याने करून घ्याल. कामाच्या ठिकाणी योग्य परिणाम संभवत आहेत. प्रगतीचे नवीन आयाम गाठाल.
मीन
पोटाच्या तक्रारी, मानसिक आजार आज डोके वर काढतील. कोणत्याही परिस्थितीत निर्णय घेताना आज संभ्रमित अवस्था टाळावी लागेल. दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे.