आज २६ ऑक्टोबर शनिवार असून आश्लेषा नक्षत्र आहे. शुक्ल योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच वणिज करण आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी शनिवारचा दिवस कसा असणार?
मेष – भागीदारी संदर्भातील कामे होण्याची शक्यता. व्यवसायात फायदा चांगला होईल. पित्याकडून लाभ होऊ शकतो.
वृषभ – हरवलेले धन प्राप्त होऊ शकते. वृद्ध नातेवाईकांची भेट होण्याची शक्यता. दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता किंवा तशी बातमी मिळेल.
मिथून – व्यवसाय निमित्ताने किंवा यात्रेसाठी दूरचा प्रवास संभवेल. एकटेपणा जाणवेल, बदली करण्याची इच्छा होईल. प्रवास सुखकर असेल तरीही वाहने सावकाश चलवावित.
कर्क – कामामध्ये छान फायदा होऊ शकतो. आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील. कष्ट थोडे जास्त होतील परंतु त्यातून लाभ देखील उत्तम प्रकारे होण्याची शक्यता.
सिंह – मित्रमंडळी भेटतील. स्नेही लोकांची मदत मिळेल. कामासाठी केलेले प्रयत्ने सफल होतील. कुटुंबासाठी खर्च कराल. आरोग्य सांभाळावे हॉस्पिटल इत्यादी होण्याची शक्यता दिसते.
कन्या – थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो. फार आळस निर्माण होईल. प्रयत्ने निष्फळ होण्याची शक्यता. अध्यात्मात प्रगती करावी. मार्ग नक्की मिळेल.
तूळ – आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतील. नोकरीच्या संदर्भातील अडचणी दिसतील. अधिकार पद हातून जाण्याची संभावना आहे. संभ्रमित होवून चुकीचे निर्णय घेऊ नका.
वृश्चिक – उत्तम धनलाभ होण्याची शक्यता. व्यवसाय कार्ये तथा कुटुंबासाठी वेळ कसा द्यावा ह्या विषयात उत्तम प्रगत व्हाल. अपेक्षित अर्थात हवा तिथेच खर्च करा. घरात आनंदी वातावरण असेल.
धनु – आरोग्य तर सांभाळावे तसेच वाहने देखील सावकाश चालवावीत अन्यथा अपघाताची शक्यता दिसते. नवनवीन कार्ये करण्याची इच्छा जागृत होऊ शकते.
मकर – प्रेमप्रकरणात यश दिसत असले तरी घरातील लोकांची सहमती घेऊन पुढे निर्णय घ्या. घरातील लोकांच्या विरोधात कोणताही निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते. विचारपूर्वक कार्ये करा.
कुंभ – जसे काम तसे फळ मिळेल. नियमित आपली कार्ये केल्याने उत्तम प्रकारे यशप्राप्ती होईल. संतति सुख मिळेल. कलाकौशल्यात छान प्रगती होण्याची शक्यता.
मीन – आरोग्याची प्रतिकारशक्ती कमी होईल. कोणत्याही कार्याप्रती महत्वाकांक्षा कमी होऊ देऊ नका. तुम्ही सर्व प्रकारे तयार आहात केवळ आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. ध्यान-धारणा वाढवा व स्वतःवर विश्वास ठेवा.