मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रसने आता दुसरी यादी जाहीर केलीय. काँग्रेसने पहिल्या यादीत ४५ नावे जाहीर केली होती. तर तिसऱ्या यादीत २३ उमेदवारांची नावे आहेत. काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आलाय. सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांना सावनेरमधून उमेदवारी देण्यात आलीय. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात सुरेश भोयार या तगड्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून त्यात २३ उमेदवारांचा समावेश आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या (Central Election Committee) बैठकीनंतर काही जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आला होता. यानंतर आज ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. तसेच ज्या जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही त्या जागांवर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय?
महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये ९०-९०-९० असा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. त्याप्रमाणे उमेदवार यादी जाहीर करण्यात येत आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ८० तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ४५ उमेदवार जाहीर केले आहेत.
काँग्रेसच्या 23 उमेदवारांची यादी
भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गणगणे
वर्धा – शेखर शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरीश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व -:काळू बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळिवाडा : गणेश यादव
श्रीरामपूर : हेमंत ओगले
निलंगा : अभय कुमार साळुंखे
शिरोळ : गणपतराव पाटील