Horoscope today 25 October 2024: आज पुष्य नक्षत्र असून शुभ योग तयार झाला आहे; त्यामुळे कुणाचे नशीब चमकणार? वाचा राशीभविष्य!

आज २५ ऑक्टोबर शुक्रवार असून पुष्य नक्षत्र आहे. शुभ योग असून तैतिल करण आहे. त्यामुळे कुठल्या राशींसाठी आजचा दिवस शुभ असणार? जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असणार?

मेष – आपल्या केलेल्या कष्टांचे फळ मिळण्याचा दिवस आहे.

वृषभ – आपला वेळ व्यर्थ न घालवता ध्येयपूर्तीवर लक्ष केंद्रित करा. प्रगती दूर नाही, कष्टाचे फळ लवकरात लवकर मिळणार.

मिथून – कष्टाचे फळ कमी प्रमाणात मिळत असता खचून न जाता केवळ ध्येयप्राप्तीकडे लक्ष असू द्या कारण पुढे लाभ देखील मिळणार आहे.

कर्क – थकवा जाणवेल परंतु कार्ये थांबवू नका, त्यातून इच्छित धनलाभ होऊ शकतो. स्नेही लोक भेटतील.

सिंह – प्रयत्नातून उत्तम यश मिळू शकते. तुमच्याकडून गरजू लोकांची मदत होईल.

कन्या – लवकरच भरपूर लाभ होणार असल्याची शक्यता आहे. गरज असलेल्या ठिकाणी खर्च करा, लवकरच भरभराट होणार आहे.

तूळ – घरगुती कामातून उत्तम लाभ होऊ शकतो. तसेच घरासंदर्भात किंवा जमिनीसंदर्भातील कामे पार पडतील.

वृश्चिक – थोड्याशा त्रासासाठी मिळालेल्या सुखाचा त्याग करू नका तो आपल्या कुटुंबासह साजरा करा.

धनु – सावकाश वाहने चलवावित अन्यथा अपघात होण्याची शक्यता दिसते. काहीतरी नवीन कामे कराल, भावंडांशी संपर्क होईल.

मकर – आपल्या घरामधे आनंद तथा प्रसन्नता जाणवेल, कामाच्या ठिकाणी देखील आनंदी असाल, सुखद दिवस असेल.

कुंभ – नाही त्या ठिकाणी पैसे गुंतवू नका, तसेच आज व्यवसायातून मात्र धनलाभ चांगला होईल.

मीन – शत्रूंपासून सावधान राहावे. प्रवासात किंवा अनोळखी ठिकाणी फसवणुक होऊ शकते. अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेऊ नका.