आज २४ ऑक्टोबर गुरुवार असून पुष्य नक्षत्राचा योग जुळून आला आहे. तसेच कालाष्टमी आणि गुरुपुष्यामृतयोग आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग, गुरु पुष्य योग, साध्य योग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहेत. त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी गुरुवारचा दिवस कसा असणार?
मेष – जोडीदाराकडून धनलाभ होण्याची शक्यता. भागीदारी सारख्या व्यवसायांमध्ये फायदा होऊ शकतो. नोकरीत देखील विशेष लाभ दिसतो.
वृषभ – प्रेमात अपयश मिळण्याची शक्यता आहे. हे अपयश तुमचे नुकसान करणार नाही तर सत्य परिस्थिती दाखवेल. आपल्या करियरकडे लक्ष द्यावे असा संकेत नियती आपल्याला देत आहे.
मिथून – आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अपेक्षेपेक्षा अधिक खर्च होऊ शकतो. या ठिकाणी द्विधा मनस्थिती उत्पन्न होऊ शकते.
कर्क – आरोग्य सांभाळावे, तसेच आज फारच आळशीपणा जाणवू शकतो.
सिंह – प्रयत्नांतून यश मिळेल. कार्य करत रहा, यश नक्कीच मिळेल.
कन्या – घर संदर्भात कार्ये आज करू नका त्यात केवळ कष्ट करावे लागेल, फायदा मात्र फार कमी होईल.
तूळ – माता पित्याचे सुख मिळेल, त्यांच्या सुखासाठी काही नवीन निर्णय घ्याल मात्र ते नाराज होतील असे काही कार्ये करू नका.
वृश्चिक – आपल्या व्यवसायातून उत्तम धनलाभ होण्याची शक्यता. कुटुंबासाठी खर्च करा. थोडी कुरबुरी राहील परंतु अपेक्षित फायदा होऊ शकतो.
धनु – आरोग्य सांभाळावे. वाहने सावकाश चलवावित, कामाला लवकर पोहचावे या निमित्ताने आपण जलद गतीने वाहने चालवू नये.
मकर – जोडीदाराचे अर्थात पती/पत्नीचे असलेले गैरसमज अथवा घरात होणाऱ्या कुरबुरी कमी होताना दिसतील. घरामधे आनंद तथा प्रसन्नता जाणवेल.
कुंभ – ऑनलाईन साईटवर अजिबातच पैसे गुंतवू नका, सुरुवातीस छान वाटेल परंतु नुकसान देखील होऊ शकते.
मीन – दूरचा प्रवास होईल परंतु त्यातून आजार संभवण्याची शक्यता दिसते. त्यामुळे अधिक जलद गतीने किंवा अधिक काळ प्रवासात राहू नये.