वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर; 16 उमेदवारांची घोषणा, अजित पवारांविरोधात दिला उमेदवार!

Maharshtra vidhansabha Election 2024 : महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhansabha Election) प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडीने आज (दि.२१ ऑक्टोबर) उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये १६ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. पाचव्या यादीमध्ये देखील वंचित बहुजन आघाडीने विविध समाज घटकांतील उमेदवार दिले आहेत.

दरम्यान, एकीकडे राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठी लढत दिसत आहे. तर, तिसर्‍या आघाडीनेही आपले उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरवले असून १० नावे जाहीर केली आहेत. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीने याआधी चार याद्या जाहीर करत एकूण ५१ उमेदवारांची नावे जाहीर केली होती. त्यानंतर आज वंचितने पाचवी यादी जाहीर केली.

बारामतीत आता वंचितचाही उमेदवार!

बारामती विधानसभा मतदार संघातून अजित पवार निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. याच बारामतीत आता वंचितने उमेदवार उभा केला आहे. वंचितने मंगलदास निकालजे यांना बारामतीतून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निकालजे यांची लढत थेट आता अजित पवारांशी होणार असल्याचे समजते.

अशी आहे 16 उमेदवारांची यादी!

1) भुसावळ विधानसभा – जगन देवराम सोनवणे

2) मेहकर विधानसभा – डॉ. ऋतुजा चव्हाण

3) मूर्तीजापूर विधानसभा – सुगत वाघमारे

4) रिसोड विधानसभ – प्रशांत सुधीर गोळे

5) ओवळा माजिवडा विधानसभा – लोभसिंग राठोड

6) ऐरोली विधानसभा – विक्रांत चिकणे

7) जोगेश्वरी पूर्व विधानसभा – परमेश्वर रणशुर

8) दिंडोशी विधानसभा – राजेंद्र ससाणे

9) मालाड – अजय रोकडे

10) अंधेरी पूर्व विधानसभा – ॲड. संजीवकुमार कलकोरी

11) घाटकोपर पश्चिम विधानसभा – सागर गवई

12) घाटकोपर पूर्व विधानसभा – सुनीता गायकवाड

13) चेंबूर विधानसभा – आनंद जाधव

14) बारामती विधानसभा – मंगलदास निकाळजे

15) श्रीगोंदा विधानसभा – अण्णासाहेब शेलार

16) उदगीर विधानसभा – डॉ. शिवाजीराव देवनाळे