आज २१ ऑक्टोबर सोमवार असून आठवड्याचा पहिलाच दिवस आहे. त्यामुळे काही राशींसाठी आजचा सोमवार खास ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असणार?
मेष – अनपेक्षित खर्च होऊ शकतो. प्रवास घडतील, शक्यतो नियमित वाहने चालवावी. जोडीदारासह भांडणे तथा थोडक्यात वाद होण्याची शक्यता आहे. एकटेपण जाणवू शकते. आरोग्य सांभाळावे, हॉस्पिटल खर्च किंवा मेडिकल खर्च होऊ शकतो.
वृषभ – वडिलोपार्जित धन अथवा इस्टेट इत्यादींचा विचार होईल. अध्यात्मातील विषयांची आवड निर्माण होऊ शकते. अध्यात्मिकतेचा अभ्यास कराल.
मिथून – उत्तम प्रवास होईल. व्यवसायातील लाभ वाढेल. कला क्षेत्रात तथा अभ्यासात चांगले यश मिळू शकेल. योग्यभ्यासाने उत्तम आरोय लाभेल. शंका निरसन होईल. उत्तम मार्गदर्शन मिळेल.
कर्क – भावंडांशी संपर्क सधाल, नोकरी/व्यवसाय संदर्भात पूर्वीचे धन अथवा दिलेले कर्ज इत्यादी मिळण्याची संभावना दिसते. जवळचे नातेवाईक भेटतील, थोडक्यात मानसिक त्रास होऊ शकतो. मौन धारण करावे.
सिंह – गृहसुख लाभेल. पारिवारिक भेट होण्याची शक्यता. घरगुती कामात/व्यवसायातील लाभात वाढ होईल. पत्निकडील स्नेही लोकांची भेट होईल. साधारण आरोग्याच्या तक्रारी भासतील.
कन्या – उत्तम अध्यात्म कळेल. जगाचे सत्य काय? हे जाणण्याचा प्रयत्न करा. ही मानसिक स्थिती ठीक आहे, या द्विधा मनाला इष्ट देवतेच्या कार्यास लावा मनास निश्चित समाधान प्राप्त होईल.
तूळ – आरोग्य सुधारावे. योग्याभ्यास किंवा नियमित व्यायामाकडे लक्ष द्यावे नैसर्गिक आजार किंवा मानसिक त्रास होऊ शकतो. विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. गैरसमज संभ्रम इत्यादी अशा स्थितीला ध्यान हेच औषध आहे.
वृश्चिक – उत्तम धनलाभ होऊ शकतो. आपल्या सुंदर वणीने, शब्दांनी अनेकांची मने जिंकाल व त्यातून व्यवसायात देखील भरभराट दिसते. वडिलोपार्जित संपत्तीतून विशेष लाभाची शक्यता.
धनु – जवळचे प्रवास घडू शकतील. काहीतरी नवीन पद्धतीने कार्य करण्याचा प्रयत्न करा. आपल्या व्यवसायाची मार्केटिंग छान करा. जनसंपर्क वाढवा, गोड शब्दांचा उपयोग करा, यश दूर नाही.
मकर – घरातील कामांकडे लक्ष द्या. दूरचा प्रवास टाळावा. मातृसौख्य लाभेल. विश्रांतीचा काळ आहे, एकटेपणा देखील जाणवेल, परंतु निराश न होता संधीची वाट पहा. थोडया विश्रांतीनंतर पुन्हा नवीन कार्ये हाती घ्याल.
कुंभ – व्यवसाय/नोकरीत विशेष लाभ मिळण्याची शक्यता. उच्च अधिकार प्राप्त होण्याची शक्यता आहे. आपल्या करियरकडे आपली तीक्ष्ण नजर आहे, ध्येय प्राप्तीसाठी अनेक कष्ट आपण घेत आहात आणि त्याचे फल देखील उत्तम मिळणार आहे.
मीन – प्रतिकार शक्ती कमी असल्याने नैसर्गिक आजार संभवतील. महत्त्वाकांक्षा कमी होऊ देऊ नका. संभ्रमात पडू नका. कोण काय म्हणाते याकडे दुर्लक्ष करून तुम्हाला जे योग्य वाटेल ते निश्चित कार्य पूर्ण करा. त्याचे उत्तम फल मिळेल.