Health tips : वजन कमी करणे सोपे काम नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. निरोगी आहार आणि नियमित व्यायामाने आपण वजन कमी करू शकतो. त्याचबरोबर आयुर्वेदात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या वजन कमी करण्यासाठी प्रभावी मानल्या जातात. यापैकी एक म्हणजे मेथी. मेथीच्या पिवळ्या लहान बियांमध्ये भरपूर पोषक घटक असतात आणि ते चरबी कमी (Belly Fat Loss Tips) करण्यास मदत करतात. शारीरिक समस्या दूर करण्यासाठी मेथीचा वापर केला जातो. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असते. तसेच याने वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी मेथी कशी उपयोगी आहे? त्यासाठी खालील दिलेली माहिती पोटाची चरबी आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी तुम्हाला चांगली उपयोगी ठरू शकते.
दरम्यान, मेथीच्या दाण्यांमध्ये अघुलनशील फायबर पुरेशा प्रमाणात आढळते. मेथी दाणे पचनासाठी चांगले असतात आणि शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढतात. याशिवाय, ते रक्तातील साखरेची पातळी कमी करते आणि सूज नियंत्रित करते. यातील पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. त्यामुळे मेथीचे नियमित सेवन करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे वाचा वजन कमी करण्यासाठी कशा प्रकारे मेथीचे सेवन कराल?
मेथीमधील पोषक तत्व काय?
मेथीच्या दाण्यांमध्ये सॉल्यूबर फायबर भरपूर असते. ज्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहत आणि पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. फायबरशिवाय मेथीच्या दाण्यांमध्ये कॉपर, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन ए, बी6, सी, के, कॅल्शिअम, आयर्न आणि फॉलिक अॅसिड असते. जे शरीराला भरपूर फायदे देतात.
कसे बनवाल मेथीचे पाणी?
तुम्ही मेथीचे पाणी दोन पद्धतीने बनवू शकता. पहिली पद्धत म्हणजे एक कप किंवा एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे टाकून रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी पाणी थोडे गरम करून गाळून घ्या आणि पाण्याचे सेवन करा. तसेच, दुसरा उपाय म्हणजे सकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा मेथीचे दाणे टाकून उकडा. हे पाणी गाळून घ्या आणि सेवन करा. तसेच आपल्या हर्बल टी मध्ये टाकूनही तुम्ही याचे सेवन करू शकता. भिजवलेल्या किंवा शिजलेल्या मेथीचे दाणे तुम्ही चावून खाऊ शकता.
मेथीच्या दाण्यांचे इतर फायदेही जाणून घ्या!
1) बद्धकोष्ठतेची समस्या होऊ द्यायची नसेल तर एक चमचा मेथीचे दाणे २ ग्लास पाण्यात टाकून उकडू द्या. पाण्याला मेथीचा रंग येईपर्यंत उकडू द्या. नंतर पाणी गाळून मेथीचे दाणे वेगळे करा आणि पाणी थंड होऊ द्या. हे पाणी कोमट झाल्यावर एक एक घोट सेवन करा. याचा तुम्हाला लवकरच फायदा दिसेल.
2) मेथीच्या दाण्याच्या पाण्याचे सेवन नियमितपणे केले तर याने पचनक्रियाही चांगली होईल. इतकेच नाही तर पोटाशी संबंधित अनेक समस्याही याने दूर होतात.
3) अनेक लोकांना रात्री लवकर किंवा चांगली झोप येत नाही. जर तुम्हाला रात्री चांगली झोप येत नसेल तर तुम्ही मेथीच्या दाण्याचे पाणी पिऊ शकता. याने तुम्हाला रात्री चांगली झोप येईल.
4) मेथीच्या दाण्याचे वेगवेगळ्या पद्धतीने सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हलही संतुलित करण्यास तसेच किडनीसंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते.
5) मेथीच्या दाण्यांमुळे डायबिटीसची समस्या दूर करण्यास आणि हृदयासंबंधी समस्या दूर करण्यास व केस चांगले ठेवण्यास मदत मिळते.
6) मेथीच्या पाण्याने फुप्फुसांसंबंधी समस्यांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. या वेगवेगळ्या समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मेथीच्या पाण्याचे सेवन आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा करावे.
(टीप : वरील उपाय केवळ माहितीकरिता दिले असून, कुठलाही उपाय करताना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)