आज २० ऑक्टोबर रविवार, चंद्र त्याच्या उच्च राशीत वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, गुरु आधीपासून स्थित असल्यामुळे गजकेसरी योग तयार होईल. तसेच संकष्टी चतुर्थीचे व्रत असून करवा चौथ देखील आहे. त्यामुळे करवा चौथच्या दिवशी कुठल्या राशींना शुभ योगाचा लाभ मिळेल? चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी रविवारचा दिवस कसा असणार?
मेष- आरोग्याच्या तक्रारी जाणवतील परंतु प्रतिकार शक्ती देखील चांगली असेल त्यामुळे कष्ट झाले तरी कार्ये पूर्ण करा. शत्रूंपासून सावधान असावे.
वृषभ- दूषित पाण्यामुळे आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्यावी. पार्टनरशिप गुंतवणूक करू शकता पुढे फायदा होऊ शकतो. कोर्ट कचेरी संदर्भात यश मिळण्याची शक्यता.
मिथून- तुम्ही ज्या क्षेत्रात आहेत तिथे लाभाची शक्यता आहे. निर्णयप्रक्रियेत अडचण येऊ शकते अर्थात काय निवडावे हे कळण्यास मार्ग मिळणार नाही यासाठी उत्तम मार्गदर्शन घ्यावे मगच निर्णय घ्यावा. बाकी आरोग्य सांभाळावे, बाहेरचे खाणे टाळावे.
कर्क – प्रवास केल्याने थकवा जाणवेल, त्यामुळे अधिकतर घरगुती कामे करण्याचा प्रयत्न करा, त्यात फायदा आहेच. अधिक धावपळ करू नका कारण लगेच आरोग्य बिघडेल असे दिसते.
सिंह – जलद कार्ये होतील, मेडिकल, इलेक्ट्रॉनिक इत्यादी व्यवसायात पैसे गुंतवले असता फायदा होऊ शकतो. मार्केट क्षेत्रात पैसे गुंतवू नका फसवणुक होऊ शकते.
कन्या – छोट्या-मोठ्या कमांमधे चांगले यश मिळू शकते. नोकरीतून विशेष प्रसन्नता वाटेल. विशेष कष्ट जाणवणार नाहीत, झालेल्या आजारातून बाहेर पडा. नवीन निर्णय घेण्याची तयारी करा.
तूळ – अधिक खर्च होऊ शकतो. काही ठिकाणी व्यय देखील होईल त्यामुळे दक्षता असावी. संभ्रमात राहू नका सत्य जाणण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बदल करण्याचे विचार त्रास देतील त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या.
वृश्चिक – आरोग्यासाठी, कामासाठी किंवा अभ्यासासाठी आजचा दिवस प्रसन्नतापूर्वक भासेल. काही ठिकाणी थोडा एकटेपणा जाणवू शकतो, परंतु निराशेकडे न जाता धेयप्राप्तीकडे लक्ष द्या.
धनु – कुटुंबासह प्रवास करण्याचा योग आहे, प्रवास छान होईल परंतु खर्च मात्र अधिक कराल. आज आवडीचे पदार्थ खाण्यास मिळतील. शक्यतो दूरचा प्रवास टाळावा. आरोग्याच्या समस्या येऊ शकतात.
मकर – शेजारचे त्रासदायकच ठरू शकतात. जवळचे प्रवास होतील. भावंडांसह किंवा काही लोकांशी थोडक्यात वादविवाद होण्याची शक्यता. आपण मौन राहिले असता निश्चितच वाद वाढणार नाही.
कुंभ – आज घरातील वातावरण प्रसन्नतेने भरेल, शुभ बातमी मिळू शकेल. स्नेही लोकांशी भेट घ्या. घरात अध्यात्मिक कार्ये घडतील. मित्रमंडळीची भेट होईल. दूरचा प्रवास होऊ शकतो.
मीन – पंचमात राहू आल्याने मन अनेक वेळा अस्वस्थ होऊ शकते. महत्वाकांक्षेला कमीपणा येऊ शकतो. शिक्षणात मन लागणार नाही. अशावेळी वेळी इष्ट देवतेचे अधिकाधिक चिंतन करावे, ईश्वरावर विश्वास असता निश्चित मार्ग मिळेल.