भाजपच्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; फडणवीस, बावनकुळेंसह अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट!

Maharashtra assembly election 2024 : महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे खरे बिगूल आज वाजताना दिसत आहे. कारण भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. भाजपकडून पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच यात काही जणांचे तिकीटही कापण्यात आले आहे. तर अनेक ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे.

दरम्यान, विशेष म्हणजे भोकरमधून खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याणमधून आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कामठीमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुडमधून उमेदवारी!

भाजपने पहिली यादी जाहीर केली असून, यामध्ये चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुडमधून उमेदवारी देण्यात आली असून नितेश राणे यांनाही संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेच्या २८८ जागांवर एकाच टप्प्यात म्हणजेच २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला निकाल लागणार आहेत.

पहिल्या यादीत १३ महिलांना संधी!

पहिल्या यादीत भाजपकडून १३ महिलांना संधी
देण्यात आली आहे. श्रीगोंदामध्ये प्रतिमा पाचपुते, पर्वतीमधून माधुरी मिसाळ, जिंतूर मेघना बोर्डीकर, गोरेगाव विद्या ठाकूर, बेलापूर मतदारसंघातून बेलापूर मंदा म्हात्रे, चिखली श्वेता महाले, दहिसर मनीषा चौधरी, केजमधून नमिता मुंदडा, शेवगावमधून मोनिका राजळे, नाशिक पश्चिम सीमा हिरे, कल्याण पूर्व मतदारसंघातून सुलभा गायकवाड, फुलंब्री अनुराधा चव्हाण आणि भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

कोण आहे भाजपच्या पहिल्या यादीत?

1. नागपूर दक्षिण पश्चिम – देवेंद्र फडणवीस
2. कामठी – चंद्रशेखर बावनकुळे
3. शहादा – राजेश पाडवी
4. नंदुरबार – विजयकुमार कृष्णराव गावित
5. धुळे – अनुप अग्रवाल
6. सिंदखेडा – जयकुमार जितेंद्रसिंग रावल
7. शिरपूर – काशीराम वेचन पावरा
8. रावेर – अमोल जावले
9. भुसावळ – संजय वामन सावकारे
10. जळगाव – सुरेश दामू भोले
11. चाळीसगाव – मंगेश रमेश चव्हाण
12. जामनेर – गिरीश दत्तात्रेय महाजन
13. चिखली – श्वेता विद्याधर महाले
14. खामगाव – आकाश पांडुरंग फुंडकर
15. जळगाव (जामोद) – डॉ. संजय श्रीराम कुटे
16. अकोला पूर्व – रणधीर प्रल्हादराव सावरकर
17. धामगाव रेल्वे – प्रताप जनार्दन अडसद
18. अचलपूर – प्रविण तायडे
19. देवली – राजेश बकाने
20. हिंगणघाट – समीर त्र्यंबकराव कुणावर
21. वर्धा – पंकज राजेश भोयर
22. हिंगणा – समीर दत्तात्रेय मेघे
23. नागपूर दक्षिण – मोहन गोपालराव माते
24. नागपूर पूर्व – कृष्ण पंचम खोपडे
25. तिरोरा – विजय भरतलाल रहांगडाले
26. गोंदिया – विनोद अग्रवाल
27. अमगाव – संजय हनवंतराव पुरम
28. आमोरी – कृष्णा दामाजी गजबे
29. बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार
30. चिमूर – बंटी भांगडिया
31. वानी – संजीव रेड्डी बापुराव बोडकुरवार
32. रालेगाव – अशोक रामाजी उईके
33. यळतमाळ – मदन येरवर
34. किनवट – भीमराव रामजी केरम
35. भोकर – सुश्री श्रीजया अशोक चव्हाण
36. नायगाव – राजेश संभाजी पवार
37. मुखेड – श्री तुषार राठोड
38. हिंगोली – तानाजी मुटकुले
39. जिंतूर – मेघना बोर्डिकर
40. परतूर – बबनराव लोणीकर
41. बदनापूर – नारायण कुचे
42. भोकरदन – संतोष रावसाहेब दानवे
43. फुलंब्री – अनुराधाताई अतुल चव्हाण
44. औरंगाबाद पूर्व – अतुल सावे
45. गंगापूर – प्रशांत बंब
46. बगलान – दिलीप बोरसे
47. चंदवड – राहुल दौलतराव अहेर
48. नाशिक पूर्व – राहुल उत्तमराव ढिकाले
49. नाशिक पश्चिम – सीमा हिरे
50. नालासोपारा – राजन नाईक
51. भिवंडी पश्चिम – महेश प्रभाकर चौघुले
52. मुरबाड – किसन कथोरे
53. कल्याण पूर्व- सुलभा कालू गायकवाड कालू गायकवाड
54. डोंबिवली – रवींद्र चव्हाण
55. ठाणे – संजय केळकर
56. ऐरोली – गणेश नाईक
57. बेलापूर – मंदा म्हात्रे
58. दहिसर – मनीषा चौधरी
59. मुलुंड – मिहिर कोटेचा
60. कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
61. चारकोप – योगेश सागर
62. मालाड पश्चिम – विनोद शेलार
63. गोरेगाव – विद्या ठाकुर
64. अंधेरी पश्चिम – अमीत साटम
65. विले पार्ले – पराग अलवणी
66. घाटकोपर पश्चिम – राम कदम
67. वांद्रे पश्चिम – आशिष शेलार
68. सायन कोळीवाडा – कॅप्टन आर. तमिल सेल्वन
69. वडाळा – कालिदास कोळंबकर
70. मलबार हिल – मंगल प्रभात लोढा
71. कुलाबा – राहुल नार्वेकर
72. पनवेल – प्रशांत ठाकुर
73. उरान – महेश बाल्दी
74. दौंड – राहुल सुभाषराव कुल
75. चिंचवाड – शंकर जगताप
76. भोसरी – महेश लांडगे
77. शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोळे
78. कोथरूड – चंद्रकांत पाटील
79. पर्वती – माधुरी मिसाळ
80. शिर्डी – राधाकृष्ण विखे
81. शेवगाव – मोनिका राजळे
82. राहुरी – शिवाजीराव भानुदास कर्डिले
83. श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते
84. कर्जत जामखेड – राम शिंदे
85. केज – नमिता मुंदडा
86. निलंगा – संभाजीपाटील निलंगेकर
87. औसा – अभिमन्यू पवार
88. तुळजापूर – राणाजगजितसिंह पाटील
89. सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख
90. अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी
91. सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख
92. मान – जयकुमार गोरे
93. कराड दक्षिण – अतुल भोसले
94. सातारा – शिवेंद्रराजे भोसले
95. कणकवली – नितेश राणे
96. कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक
97. ईचलकरंजी – राहुल आवाडे
98. मिरज – सुरेश खाडे
99. सांगली – सुधीर गाडगिळ