महाराष्ट्र : मागील चार पाच दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यातील काही जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. पावसाची उघडझाप झालेल्या भागात उकाडा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पुढील तीन दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आला आहे. हवामान विभागाने राज्यातील काही जिल्हांसाठी पावसाचा अलर्ट दिला आहे.
या जिल्ह्यात यलो अलर्ट!
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , बीड, धारशिव, लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला पावसचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. धुळे नाशिक, नंदुरबार, अहिल्या नगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात या जिल्ह्यांत आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, वाशिम, बुलडाणा , वर्धा आणि यवतमाळ जिल्हातही पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अमरावती, नागपुरात जोरदार पाऊस!
हवामान विभागाकडून २ दिवसासाठी संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी विदर्भातील तुरळक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झालाय. अमरावती, नागपुरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याची माहिती आहे. तर इतर जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम सूर्यप्रकाश तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळाले. तसेच, आज १९ ऑक्टोबरला विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूरमध्ये आज अंशतः ढगाळ वातावरण राहून हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या जिल्ह्यात मध्यम सूर्यप्रकाश!
उर्वरित जिल्ह्यांत म्हणजेच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत वातावरण मध्यम सूर्यप्रकाश राहून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. विदर्भात मधल्या काळात पावसाचा जोर कमी झाला होता. आता शुक्रवार पासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. अमरावतीमध्ये आज सकाळी विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस झाला.