Horoscope today 19 October 2024: आज शनिवार असून शश राजयोग; कुठल्या राशींवर शनिदेवाची कृपा राहिल? वाचा राशीभविष्य!

xr:d:DAFyDbmqmzE:12,j:8487440375216873287,t:23102305

आज १९ ऑक्टोबर शनिवार असून शश राजयोग तयार झाला आहे. त्यामुळे कुठल्या राशींवर शनिदेवाची कृपा राहिल? जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी शनिवारचा दिवस कसा असणार?

मेष- घरासंदर्भातील कामे होतील. मातृसुख मिळेल. घरात आनंदाचे वातावरण असू शकते. आरोग्य उत्तम राहील. प्रसन्नता वाटेल. वाहनसुख, गृहसुख इत्यादी मिळेल.

वृषभ- शिक्षणात विशेष लाभ मिळण्याची शक्यता. संततीकडून आनंद प्राप्त होईल. ईश्वरभक्ती, उपासना, आराधना इत्यादी वाढेल, अशी संभावना. नवीन अभ्यास करण्यास इच्छा होईल. गुंतवणुकीत फायदा.

मिथुन- आरोग्य सांभाळावे तक्रारी येऊ शकतात. द्विधा मनस्थिती होऊन निर्णय घेण्यास अडचण येऊ शकते. प्रवास नियमित करावा, भावंडांशी संपर्क होईल.

कर्क- जोडीदारासोबत घरातील कामांसाठी हजेरी लावाल. मातृसुख मिळेल. भागीदारीत विशेष लक्ष असावे. गृहसौख्यासाठी कष्ट करावे लागेल. परिश्रमाचे फळ मिळेल.

सिंह- शेअर मार्केटमध्ये फायदा होऊ शकतो. एकटेपणा जाणवेल. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करु नये अन्यथा अधिकार गमावून बसू शकता. योग्य ठिकाणी आपल्या ऊर्जेचा उपयोग केल्यास योग्य मोबदला मिळेल.

कन्या- प्रतिकार शक्ती कमी होईल. थकवा जाणवू शकतो. प्रवास कष्टदायक वाटेल, परंतु तरीही प्रवासातील कामे आपण कराल. अध्यात्मिक शक्ती वाढवावी, इष्ट देवतेची आराधना करावी, ज्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल.

तूळ- नोकरी/व्यवसाय संदर्भात अडचणी निर्माण होण्याची संभावना दिसते. याविषयावरुन जोडीदारासह वादविवाद होऊ शकतो. घरचा विषय कामाच्या ठिकाणी व कामाचा विषय घरी नाही काढला तर कदाचित शांतता राहील.

वृश्चिक- लाभदायक काळ असेल. विशेष खरेदी करा. वाहन सुख लाभेल. मित्रांची तथा स्नेही व्यक्तींची भेट होऊ शकते. व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो.

धनु- शक्यतो दूरचा प्रवास टाळावा. अभ्यासाकडे लक्ष द्यावे अन्यथा मिळालेली संधी वाया जावू शकते. बुध्दीचा योग्य उपयोग करुन अध्यात्मात प्रगती करुन घ्यावी. निश्चित ईश्वर कृपा होईल.

मकर- कामे जलद गतीने होणार नाहीत, परंतु नियमित मात्र होतील. व्यवसायात विशेष लाभ होईल. नियतीने कार्ये कराल तर उत्तम फळ मिळू शकते.

कुंभ- कष्टांचे फळ थोडे विलंबाने मिळेल. जिथे धैर्य असेल तिथे नक्कीच छान फळ मिळेल, त्यामुळे सर्व कार्ये धैर्याने करावीत. देवावर विश्वास ठेवा तुमच्या वाटेचे फळ तुम्हालाच मिळणार.

मीन- या राशीत बारावा चंद्र असून राहू स्थित आहे, ज्यामुळे निर्णय घेण्याची क्षमता कमी होऊ शकते. अर्थात काहीशा ठिकाणी द्विधा मनस्थिती होऊ शकते, अशा वेळी आपल्या आवडत्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्यावे त्यातून मार्ग मिळेल.