प्रचार सभा ताकदीने केल्या पाहिजे; रामटेकसाठी आमचे मोठे मन, नागपूर दौऱ्यावर असताना सुषमा अंधारे नेमक्या काय म्हणाल्या?

नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी राजकीय पक्षांकडे तिकीटासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. काही वर्षांपूर्वी ठाकरे गटात प्रवेश केलेल्या सुषमा अंधारे यांनी राज्यात मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. गेल्या काही महिन्यात सुषमा अंधारे यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. त्यामुळे सुषमा अंधारे निवडणूक लढवण्यावरून राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, सुषमा अंधारे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यावरून मोठे भाष्य केले आहे.

दरम्यान, सुषमा अंधारे हे नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी काल विधानसभा निवडणुकीवर मोठे भाष्य केले आहे. “पक्षासाठी काम करून निवडणूक लढण्यापेक्षा प्रचार सभा ताकदीने केल्या पाहिजे” अशी इच्छा आहे, असे त्या म्हणाल्या.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

विश्रांतवाडी कार्यालय घरापासून लांब आहे. त्यामुळे वडगाव शेरी, शिवाजी नगर, हायवेला ऑफिस असावे म्हणून केले आहे. बापू पठारे हे इच्छुक आहेत. पण आमच्या पक्षाकडे चांगले चेहरे आहेत. ते हडपसर मागत आहे. कोथरूड मागत आहेत. बारामती मागत नाही. त्यामुळे, बहुतेक पिंपरी सुटत आहे, अशी माहिती अंधारे यांनी दिली. तुम्ही निवडणूक लढण्यापेक्षा पक्षासाठी प्रचार सभा ताकदीने केल्या पाहिजे. बळवंत वानखेडे आमदार होते. आता खासदार आहेत. त्यामुळे दर्यापूर जिंकू शकतो. मशाल पेटवण्यासाठी मदत करू असे बळवंत वानखडे म्हणाले होते. यशोमती ठाकूर यांच्यासमोर तशी भूमिका देखील मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.

‘हे’ पक्षाच्या हितात निर्णय घेतात!

महाविकास आघाडीतील तिढ्यावर बोलताना अंधारे म्हणाल्या, कोणालाही वाटेल मेहनत केली आहे. जागा मिळावी, जास्त ताकद आहे, असे वाटत असणारच हे नक्की. पक्षाचे पदाधिकारी रिपोर्ट पाठवतात. अनिल देसाई हे भूमिका मांडतात. आमचे नेते संजय राऊत हे पक्षाच्या हितात निर्णय घेतात आणि बोलतात. त्यानुसारच पक्ष आपली भूमिका मांडत आहे. त्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही, असे त्या म्हणाल्या.

रामटेकसाठी आम्ही मोठे मन केले!

लोकसभेच्या वेळी आम्ही रामटेकची जागा काँग्रेससाठी सोडली. त्यावेळी खासदार आमच्या पक्षाचे होते. पण मनाचा मोठेपणा दाखवून आम्ही ते स्वीकारले. आम्ही प्रचार सुद्धा केला, असे सांगत विधानसभेत मात्र रामटेकसाठी उद्धव सेना आग्रही असल्याचे संकेत त्यांनी दिले. कॉंग्रेस उमेदवाराचा सांगलीतला अनुभव हा वेदनादायी आहे. तो विसरणे कठीण आहे, अशी व्यथा अंधारे यांनी व्यक्त केली.

फडणवीस यांची जागा धोक्यात!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जागा धोक्यात आहे. महाराष्ट्र भाजपच्या मालकाची सीट धोक्यात असल्याचे अनेक सर्व्हे सांगत सांगत आहेत, असा दावा करीत आमच्या वाट्याला दक्षिण पश्चिम आली तर आम्ही लढू, असेही अंधारे यांनी स्पष्ट केले.