आज १८ ऑक्टोबर शुक्रवार आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. तसेच, वज्र योग असून तैतिल करण आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असणार?
मेष – भावंडांचे प्रेम मिळू शकेल. जवळचे प्रवास घडतील. उत्साह निर्माण होऊ शकतो. उर्वरित कामे पूर्ण होण्याची शक्यता. आवडते पदार्थ ग्रहण करा. काहीतरी नवीन कार्ये करण्याची इच्छा होईल.
वृषभ – उत्तम द्रव्यलाभ होण्याची शक्यता. घरगुती व्यवसायात तथा कार्यात छान फायदा होईल. व्यापार चांगलाच होईल. घरात आनंद साजरा करा.
मिथून – स्नेही मित्रमंडळींची भेट होण्याची शक्यता. संततीची चिंता राहील. स्थावर इस्टेट, जमीन, घर इत्यादी संबंधात काही मोठे निर्णय सध्या घेऊ नये.
कर्क – थोडासा थकवा जाणवू शकतो. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील, परंतु महत्वाची कामे नियमित तुम्ही स्वतःच करा. शत्रूंपासून सावध राहावे. गृहसौख्याची चिंता भासेल. मातृसूख मिळेल.
सिंह – संतती सुख व पत्नी सूख मिळण्याची शक्यता. भागीदारीत फायदा होऊ शकतो. आवश्यक बदल करता येईल. आपल्या जोडीदारासह कोणताही व्यवसाय असतात त्यात उत्तम यश मिळेल.
कन्या – मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी सहन न होणारा एकटेपणा जाणवेल. अशावेळी अध्यात्माची मदत घ्यावी. वारसाहक्क किंवा वडिलोपार्जित संपत्तीची चिंता भासू शकते.
तूळ – राजकारणातील पराक्रम उत्तम फलदायी ठरेल. तीर्थयात्रा छान होतील. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न कराल व फलास देखील येतील. आपल्या अधिकाराचा उत्तम मोबदला आपल्याला मिळेल.
वृश्चिक – व्यवसायात छान नफा होईल. आपल्या हळवेपणाचा लोक फायदा घेऊ शकतात सावध असावे, बाकी महत्वाची कार्ये संपन्न होतील.
धनु – काहीतरी विशेष कार्ये करून त्यात विशेष लाभ कमवा. तसेच धनलाभ देखील होण्याची शक्यता. व्यवसाय चांगलाच चालेल. जवळच्या मित्रांची भेट होईल. शेजारी लोकांशी संवाद होतील.
मकर – केलेले श्रम व्यर्थ जाऊ शकतात लक्षपुर्वक कार्ये करावीत. मित्रांकडून फसवणुक होण्याची शक्यता दिसते. शक्यतो आपल्या महत्वपूर्ण विषय गुपित ठेवावे.
कुंभ – आरोग्य प्रतिकार शक्ती उत्तम असेल. अभ्यास चांगला होईल, छान मार्गदर्शन मिळेल, विशेष प्रवास व खरेदी होईल, चांगले मित्र भेटतील, कार्ये सावकाश होतील.
मीन – अनपेक्षित खर्च होऊ शकतो. लाभलेले द्रव्य सांभाळावे. स्वतः वर विश्वास ठेवून कार्ये हातात घ्या. विश्वास असेल तर सर्व कार्ये पार पडतील.