तुप खाणे शरीरासाठी अत्यंत चांगले; पण गायचे की म्हशीचे? कोणते तुप शरीरासाठी फायद्याचे? जाणून घ्या सविस्तर माहिती!

Health tips : गरम भात असो, पोळी असो किंवा एखादा पराठा आणि पुरणपोळी, त्यावर जोपर्यंत तुपाची धार येत नाही, तोपर्यंत त्या पदार्थाची चव काही खूलत नाही. साजूक तुपाची जोड मिळाल्यानंतर कोणत्याही पदार्थाची चव बदलून जाते. यासोबतच साजूक तूप खाण्याचे अनेक आरोग्यदायी लाभ (benefits of eating ghee) देखील आहेत. वजन वाढेल या भीतीने अनेक लोक तूप खाणे टाळत असले तरी तूप हे एनर्जीचे पॉवर हाऊस (Cow ghee or buffalo ghee?) आहे, असे अनेक फिटनेस तज्ज्ञ मानतात.

शुद्ध तुपामध्ये प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन ए आणि ई भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्यासोबतच सौंदर्य वाढविण्यासाठीही तूप खाणे फायदेशीर ठरते. तुपामुळे जेवणाचे उत्तम पचन होते, त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात तूप असायलाच पाहिजे. पण कोणते तूप खावे, गायीचे की म्हशीचे? हा प्रश्नही अनेक जणांच्या मनात पडतो. गायीचे दूध चांगले की म्हशीचे असा प्रश्न नेहमी विचारला जातो. म्हणूनच जाणून घ्या या दोन्ही तुपांमध्ये काय मुख्य फरक आहे ते.

कोणते तूप खाणे अधिक फायदेशीर (which ghee is more beneficial?)-

दोन्ही प्रकारचे तूप निश्चितच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पण तरीही गायीचे तूप खाणे अधिक फायदेशीर मानले जाते. कारण गायीचे तूप पचनासाठी अधिक उत्तम मानले जाते. तसेच गायीच्या तुपामध्ये ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टी फंगल आणि ॲण्टी ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर असतात.

१. आयुर्वेदानुसार गायीच्या तुपात म्हशीच्या तुपापेक्षा भरपूर औषधी गुणधर्म असतात. गायीचे तूप सात्विक म्हणून ओळखले जाते. गायीच्या तुपामुळे आपली सकारात्मकता, शारीरिक-मानसिक वाढ चांगली होण्यास मदत होते.

२. पण म्हशीच्या तुपात फॅटसचे प्रमाण जास्त असल्याने ते दिर्घकाळ टिकते. पण गाईचे तूप मात्र सामान्य तापमानाला तितके टिकत नाही.

३. ज्यांना वजन कमी करायचे आहे ते आवर्जून गायीचे तूप खातात कारण म्हशीच्या तुपातील फॅटसमुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

४. महिलांना किंवा वयस्कर व्यक्तींना हाडांच्या समस्या असतात. त्यांना हाडांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर म्हशीचे तूप जास्त चांगले. तसेच हवबदलामुळे होणारा सर्दी-खोकला आणि कफ कमी होण्यासाठीही म्हशीचे तूप खाणे चांगले.

५. ज्यांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी आवर्जून गायीचे तूप खायला हवे. गायीच्या तुपाचा पचण्याचा दर ९६ टक्के असतो तर म्हशीचे तूप फॅटस जास्त असल्याने पचायला जड असते. तुम्हाला गॅसेस, अॅसिडीटी, कोठा जड असणे यांसारखे त्रास असतील तर तुम्ही आवर्जून गायीच्या तुपाचा आहारात समावेश करायला हवा.

६. कोलेस्टेरॉल ही आता अतिशय सामान्य समस्या आहे. आपल्याला या समस्येचा सामना करावा लागू नये असे वाटत असेल तर मात्र गायीचे तूप खाणे केव्हाही जास्त चांगले. ज्यांना आधीपासून कोलेस्टेरॉलची समस्या आहे त्यांनीही गायीचेच तूप खायला हवे.