आज १२ ऑक्टोबर विजयादशमी असून शनिवार आहे. आजचा दिवस सगळ्यात शुभ मानला आहे. या दसऱ्याच्या दिवशी रवियोग, सर्वार्थ सिद्धी योग आणि श्रवण नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने विजयादशमीच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. त्यामुळे जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी शनिवारचा दिवस कसा असणार?
मेष- घरासंदर्भातील काहीही निर्णय घेऊ नये कारण अपेक्षित परिणाम होणार नाही. प्रवासामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. अभ्यासात मन लागणार नाही. अनपेक्षित विचारांकडे दुर्लक्ष करावे.
वृषभ- दिवस साधरण ठीक आहे. कामामध्ये थोडक्यात कोणीतरी व्यत्यय आणू शकेल. बाकी नेहमी प्रमाणे नियमित कार्ये होतील. तुमचे वरिष्ठ अधिकारी लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील.
मिथून- दूरच्या नातेवाईकांशी किंवा मित्रांची भेट होण्याचा योग आहे. नोकरीच्या ठिकाणी थोडक्यात मानसिक त्रास होण्याची शक्यता दिसते. फसवणुक होऊ शकते किंवा अचानक आरोग्य बिघडू शकते.
कर्क- आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तसेच अधिक खर्च होईल असे दिसते. अनपेक्षित करु नये, अश्या विचाराचा आपल्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो त्यामुळे अधिक विचार करु नये.
सिंह- आज विशेष करुन वाहने लक्षपूर्वक तथा सावकाश चालवीत. आरोग्य उत्तम असेल. जमीन जुमला किंवा पूर्व संपत्ती यासंदर्भातील कामे करु नये अन्यथा नुकसान दर्शवेल. तसेच राजकारणासंदर्भात पण काही नवीन मुद्दे घेऊ नये.
कन्या- धनलाभ होईल परंतु खर्च देखील तेवढाच होईल. अनपेक्षित खर्च कमी केल्यास कुटुंबासंदर्भातील होणारी चिंता देखील कमी होऊ शकते व होणारे कष्ट देखील जाणवणार नाहीत.
तूळ- आपल्या वाणीनेच आपण सर्वांना प्रसन्न कराल. म्हणतात ना डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असावी याचप्रमाणे तुम्ही आजचा दिवस आनंदी कराल.
वृश्चिक- आईकडील नातेवाईकांशी भेट होण्याचा योग येईल. तसेच घरासंदर्भातील कामे लक्षात येतील. थोडक्यात आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतील.
धनु- शत्रुंपासून सावधान, मटका, जुगार इत्यादी खेळात नुकसान, दूरचा प्रवास टाळावा, अरोग्यसंदर्भात धन व्यय होईल, नोकर चाकर किंवा आपल्या हाताखाली काम करण्याऱ्या लोकांकडू त्रास होऊ शकतो.
मकर- कोणत्याही कामास उशीरच होईल परंतु आरोग्यसंदर्भात झालेल्या आजारास बरे होण्यासाठी मार्ग मिळेल. नोकरीत येणाऱ्या अडी-अडचणी काय हे लक्षात येईल. अर्थात योग्य मार्ग मिळतील.
कुंभ- कुटुंबातील सदस्यांकडे विशेष लक्ष द्याल. तसेच चांगली खरेदी देखील होईल परंतु काही ठिकाणी अनपेक्षित खर्च होईल. महत्वाचे म्हणजे आपले आरोग्य सांभाळावे.
मीन- वाहने सावकाश चालवावित. हॉस्पिटल खर्च होण्याची शक्यता दिसते. महत्त्वाकांक्षा कमी होऊ शकते. त्यामुळे कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य करताना आत्मविश्वास कायम जागृत ठेवा. कारण प्रकृतीपेक्षा तुम्ही बलवान आहात.