आज ११ ऑक्टोबर शुक्रवार असून महानवमी आहे. आज सर्वार्थ सिद्धी योग जुळून आला आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने कुठल्या राशीला यश मिळेल? जाणून घेऊया राशीभविष्य.
मेष – आज काही विशेष कार्ये करण्याची इच्छा होणार नाही. म्हणून आज घरातील लोकांना पूर्ण वेळ द्या, त्यांच्याशी हितगूज साधून बघा.
वृषभ – जमीन वाहन इत्यादी संबंधातील कामे लवकर होण्याची शक्यता. धार्मिक कार्ये करण्याची इच्छा होऊ शकते.
मिथून – रोजच्या पेक्षा आज जलद गतीने कामे होऊ शकतील. तसेच, विशेष ऊर्जा जाणवेल.
कर्क – वाहने सावकाश चालवावित, दूरचा प्रवास टाळावा.
सिंह – लाभ न होता कष्ट व्यर्थ जाण्याची शक्यता आहे. आरोग्य सांभाळावे दवाखाना होऊ शकतो.
कन्या – नफा दरवेळी पेक्षा थोडा कमी प्रमाणात होईल. घरगुती व्यवसायात उत्तम लाभ होऊ शकते. आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
तूळ – अपेक्षित धनलाभ मिळण्याची शक्यता. प्रवासात खर्च होईल परंतु तो पण चांगल्या कामाकरीता खर्च होईल.
वृश्चिक – विशेष करून घरासाठी किंवा कुटुंबातील लोकांसाठी चिंता दर्शवते परंतु जेवढे अधिक प्रसन्न राहाल तेवढाच कमी त्रास जाणवेल.
धनु – आपल्या प्रयत्नांना उत्तम यश मिळण्याची शक्यता. आईसाठी काहीतरी विशेष कार्य करा.आजचा दिवस साधारण आनंदी असेल.
मकर – साधारण खर्च होऊ शकतो, परंतु बाहेरील खाद्य पदार्थ टाळावे कारण आरोग्य बिघडण्याची शक्यता दिसते.
कुंभ – आपण केलेल्या कामाचे फल कोणी दुसराच घेण्याच्या तयारीत आहे याची दक्षता असावी.
मीन – घरात थोडी शांतता असेल. आपण आज थोडे अधिक थकलेले असू शकतो. थोडाफार प्रवासामुळे ताणतणाव वाढू शकतो.