Horoscope today 9 October 2024: आज नवरात्रीची सातवी माळ; कुणावर राहील देवीची कृपा? जाणून घ्या काय सांगतात आजचे राशीभविष्य!

आज ९ ऑक्टोबर बुधवार असून नवरात्रीची सातवी माळ आहे. त्यामुळे कालरात्री देवीची सर्वांवर कृपा राहिल. चला तर मग जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असणार?

मेष – उच्च शिक्षणसंदर्भातील कामे पूर्ण होतील. मुलांसोबत आनंद साजरा करा. प्रवास देखील सुखद होऊ शकते. तसेच, हरवलेली गोष्ट आज लक्षात येईल. अपेक्षित लोकांकडून मदत मिळू शकते. प्रवासंदर्भात कामे पूर्ण होतील, कृतज्ञता व्यक्त करा.

वृषभ – अधिक कामामुळे आपल्या कुटुंबातील किंवा स्नेही व्यक्तींना वेळ देता येत नाही म्हणून आपले मन अस्वस्थ होत असावे. त्यामुळे आपण कुटुंबातील लोकांना अपेक्षित वेळ द्या जेणेकरून आपला आनंद कायम राहील.

मिथून – प्रेमासाठी प्रयत्न करत आहात परंतु अपेक्षित प्रेम मिळत नाही याचे कारण हेच की आपण दुहेरी विचार करत आहात. द्विधा मनस्थिती सोडून स्थिर बुध्दी ठरवा तुमचे प्रेम तुम्हाला लवकरच प्राप्त होईल.

कर्क – शेअर मार्केट इत्यादी प्लॅटफॉर्मवर अजिबात पैसे गुंतवू नका अन्यथा नुकसान होण्याची शक्यता दिसते. तसेच अनपेक्षित खर्च देखील होऊ शकतो. याची दक्षता घ्यावी. मुलांकडून सुख मिळेल, स्नेही लोकांची भेट होईल.

सिंह – कुटुंबातील लोकांसाठी खर्च होईल, शक्यतो आपल्या वाणीवर नियंत्रण असावे. आपण बुध्दीमान आहात तसेच दयाळू देखील आहात त्यामुळे कदाचित याचा फायदा घेऊन आपणास कोणी फसवण्याचा प्रयत्न करेल सावधान असावे.

कन्या – आधिक प्रमाणात कार्ये मिळतील, कष्टदायक वाटू शकते परंतु असे काही नसेल अर्थात तुमच्यामध्ये चंचलता उत्तम प्रकारे आहे त्यामुळे आपले महत्वपूर्ण कार्य थांबवू नका. यातून उत्तम प्रकारे लाभ मिळेल.

तूळ – काहीतरी विशेष पराक्रम कराल अर्थात नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी विशेष लाभ मिळू शकतो किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींकडून किंवा मित्रमंडळींकडून लाभ दिसतो. जवळचे प्रवास होतील.

वृश्चिक – वेळ आहे तोपर्यंत योग्य निर्णय घ्या कारण संधी जाण्याची शक्यता आहे. कुठलाही मिळालेला लाभ त्याचा लवकरात लवकर उपयोगात आणा अन्यथा संधी निघून गेल्यावर केवळ पश्र्चाताप उरेल त्यामुळे लगेच संधी साधून घ्या.

धनु – आरोग्य प्रतिकार शक्ती वाढू शकते. जुन्या आजारापासून थोडे बरे वाटेल, पैसे गुंतवण्यास हरकत नाही. नोकरी व्यवसायात आज चांगला फायदा होऊ शकतो. प्रशंसनीय कार्ये कराल, तसेच उत्तम मार्गदर्शन देखील मिळेल. साधारण दिवस छान असेल.

मकर – आरोग्य सांभाळावे, तुम्हाला कळते काय योग्य आहे आणि काय अयोग्य त्यानुसार आपल्या मनाला जपावे, कुटुंबाकडे थोडक्यात आपले लक्ष कमी होईल. मनाचा ठाम निश्चय करून योग्य तो निर्णय घ्यावा.

कुंभ – जोडीदाराकडून विशेष लाभ होण्याची शक्यता. कोर्टकचेरीची उरलेली कामे मार्गाला लागतील. पार्टनरशीपमधून फायदा होऊ शकतो. मात्र शेअर मार्केट सारख्या विषयात वेळ घालवू नये अन्यथा मिळालेले लाभ पण व्यर्थ जाऊ शकते.

मीन – घरापासून दूर जाण्याचा योग येईल परंतु काळजी नसावी हे दूर जाणे चांगल्यासाठीच असेल अर्थात लाभदायक असेल. कदाचित व्यवसाय किंवा नोकरी संदर्भात प्रवास होऊ शकतो. काही काळ एकटेपणा जाणवेल.