Gold and silver price: सणासुदीच्या काळात भारतात सोने-चांदी खरेदी करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे. पण, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीने मोठा उच्चांक गाठला, तर चांदीच्या दरातही मोठी वाढ दिसून आली, त्यामुळे सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे टेन्शन वाढले. पण आज (09 ऑक्टोबर 2024) नवरात्रीच्या सातव्या दिवशी सोन्याच्या दरात थोडी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. हे बदल किती रूपयांनी झाले आहेत जाणून घेऊया.
दरम्यान, सोन्या-चांदीच्या दरांमध्ये रोज बदल होत असतात. कधी सोन्या-चांदीच्या दरात वाढ होते तर कधी घसरण पाहायला मिळते. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची भीती असल्याने सोन्याच्या दागिन्यांची मागणी ५० टक्क्यांनी वाढू शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर काय?
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ८८८ रुपयांनी कमी होऊन ७४५३४ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय. आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ८१७ रुपयांनी कमी होऊन ६८,५८४ रुपये प्रति १- ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ६६९ रुपये प्रति १० ग्रॅमनं घसरला आणि तो ५६१२६ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ५२२ रुपयांनी कमी होऊन ४३७७८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
आयबीजेए कडून दिवसातून दोनदा सोन्याचे दर जाहीर!
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बॉन्ड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालये आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहे.