Adhar card : आधार कार्ड हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे. अशा परिस्थितीत आधार कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास लोकांची अनेक महत्त्वाची कामे ठप्प होऊ शकतात. या कारणास्तव, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI), आधार जारी करणारी संस्था, लोकांना PVC आधार ऑनलाइन ऑर्डर करण्याची परवानगी देते. हे कार्ड घरबसल्या UIDAIच्या अधिकृत वेबसाइटवरून फक्त ५० रुपये शुल्क भरून ऑर्डर केले जाऊ शकते.
दरम्यान, पॉलिव्हिनाइल क्लोराईड कार्ड PVC कार्ड म्हणून ओळखले जाते. हे एक प्रकारचे प्लास्टिक कार्ड आहे, ज्यावर आधार कार्डची माहिती छापली जाते. UIDAI नुसार, या कार्डमध्ये सुरक्षित QR कोड, होलोग्राम, मायक्रो टेक्स्ट, जारी करण्याची तारीख आणि कार्डची छपाई आणि इतर माहिती आहे. हे कार्ड तुमच्या एटीएम किंवा डेबिट कार्डप्रमाणे तुमच्या वॉलेटमध्ये सहज बसेल. ते लवकर खराब होण्याची चिंताही नसते.
पीव्हीसी आधार कार्ड ५० रुपयांत मिळणार!
यूआयडीएआय लोकांना केवळ ५० रुपयांत पीव्हीसी आधार कार्ड देत आहे. यासाठी तुम्ही तुमच्या फोन किंवा लॅपटॉपवरून यूआयडीएआयच्या वेबसाईटवर जाऊन तुमचे पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये खर्च करावे लागतील. या ५० रुपयांमध्ये स्पीड पोस्ट शुल्काचाही समावेश आहे. यूआयडीएआय स्वत: लोकांना पीव्हीसी आधार कार्ड वापरण्याचा सल्ला देत आहे. यूआयडीएआयने लोकांना आपल्या एक्स पोस्टमध्ये पीव्हीसी आधार कार्ड वापरण्याचा सल्ला दिलाय.
कसे मागवाल पीव्हीसी आधार?
– पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करण्यासाठी https://uidai.gov.in यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– माय आधार सेक्शनमध्ये जा आणि ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा.
– आपला आधार कार्ड क्रमांक एन्टर करा आणि कॅप्चा कोड टाका. त्यानंतर सेंड ओटीपीवर क्लिक करा.
– रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी आल्यानंतर ओटीपी टाका.
– आता तुमच्या पीव्हीसी आधार कार्डची एक कॉपी तुमच्यासमोर येईल.
– आपल्या सर्व माहितीची पडताळणी करा आणि आपली ऑर्डर द्या.
– यानंतर तुम्हाला ५० रुपये भरावे लागतील, त्यानंतर तुमच्या रिक्वेस्टवर पुढील प्रक्रिया केली जाईल.
– ऑर्डर दिल्यानंतर तुमचे पीव्हीसी आधार कार्ड १५ दिवसांच्या आत किंवा १५ दिवसांनंतर तुमच्या घरी येईल.
– पीव्हीसी आधार कार्ड अनेक सिक्युरिटी फीचर्ससोबत येते.
आधार ३ फॉरमॅटमध्ये येते!
आधार कार्ड सध्या ३ फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहे – आधार पत्र, ई-आधार आणि पीव्हीसी कार्ड. UIDAI नुसार, बाजारात बनवले जाणारे PVC कार्ड वैध नाहीत. UIDAI ने अलीकडेच पॉलिव्हिनाईल क्लोराईड कार्ड (PVC) वर आधार कार्डाचे पुनर्मुद्रण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हे कार्ड तुमच्या एटीएम किंवा डेबिट कार्डप्रमाणे तुमच्या वॉलेटमध्ये सहज बसेल. ते लवकर खराब होण्याची चिंता नसते.