आज ७ ऑक्टोबर सोमवार असून नवरात्रीचा पाचवा दिवस आहे. त्यामुळे पंचमी तिथीला अनेक शुभ संयोग जुळून आले आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असणार?
मेष – द्विधा मनस्थितीतून मार्ग मिळेल. आरोग्य सांभाळावे, जवळच्या मित्रांची भेट होऊ शकते. वाहने सावकाश चालवावी. प्रयत्नशील कार्ये घडू शकतील. शत्रूंपासून सावधान राहावे. गणपतीची आराधना केल्याने इष्ट कार्य सिद्ध होईल.
वृषभ – आज प्रतिकार शक्ती उत्तम दिसते. पूर्वीच्या आजारा पासून थोडी सुटका मिळू शकते. थोडा एकटेपणा जाणवेल परंतु तो प्रसन्नतेचा भाव असेल. अध्यात्मिक शक्ती जागृत होईल. काहितरी नवीन कार्ये करण्याची इच्छा झाल्यास निश्चित करावे.
मिथून – दूरचा प्रवास टाळावा. वाहने नियमित चालवावीत अन्याथा ट्रॅफिक इत्यादी कायद्यात अडकून राहाल. आज बाहेरचे खाणे टाळा त्यापासून लवकरच आजार होण्याची शक्यता दिसते. आज महत्त्वपूर्ण निर्णय घेणे टाळा.
कर्क – कुटुंबासोबत आनंद साजरा करण्याचा दिवस असला तरी तुमचे मन थोडे अस्वस्थ असू शकते. पुढील कार्याची चिंता त्रास देईल परंतु आपण ते दुर्लक्ष करावे कारण पुढील कार्ये नियमित पार पडतील आपल्या इष्ट देवतेवर विश्वास असावा.
सिंह – नोकरीच्या ठिकाणी अनपेक्षित घटना घडण्याची संभावना आहे परंतु त्यात भाग घेऊ नये अन्यथा तुमच्यावर सर्व दोष येण्याची संभावना दिसते. शत्रूंपासून सावध राहा. मन व डोके शांत ठेवल्यास दिवस छान जाईल.
कन्या – घरातील लोकांकडून विशेष लाभ किंवा आपल्या कर्यासंदर्भात काही मदत मिळेल. स्नेही लोकांची भेट होऊ शकते. नोकरीच्या ठिकाणी थोडे कष्ट होतील परंतु आपल्याला मदत देखील मिळेल. आपली जबाबदारी पार पडल्यास, उत्तम लाभ होईल.
तूळ – मार्केट सारख्या ठिकाणी उत्तम लाभ मिळण्याची शक्यता. छान खरेदी तथा विक्री होईल, प्रेमप्रकरणात यश मिळू शकेल. अभ्यासात छान मन लागेल. अनपेक्षित खर्च होऊ शकतो त्यामुळे खर्चावर नियंत्रण असावे. वाहने सावकाश चालवावीत.
वृश्चिक – आरोग्य कष्टदायक असू शकतो. नोकरीच्या ठिकाणी शत्रूंपासून मानसिक त्रास संभावण्याची शक्यता दिसते त्यामुळे शक्यतो अनपेक्षित विषयांकडे दुर्लक्ष केले कधीही उत्तम. थोडासा आळस निर्माण होऊ शकतो तरीही महत्त्वाकांक्षा जागृत ठेवल्यास इष्ट कार्ये पार पडतील.
धनु – जोडीदाराशी थोडक्यात वादविवाद किंवा आपल्या मनाविरूद्ध काही घटना घडण्याची शक्यता आहे. आपण बरोबर असलात तरीही मन शांत ठेवावे समोरील व्यक्तीस कालांतराने त्याची चूक निश्चित कळेल.
मकर – दूरचा प्रवास टाळावा कारण कष्टदायक होऊ शकतो तसेच आरोग्याच्या तक्रारी संभवतील. जवळच्या लोकांकडून मानसिक त्रास होऊ शकतो ज्यामुळे एकटेपणा जाणवेल. अशा विषयांना मनात जागाच देऊ नका, ध्यान/धारणेतून मार्ग उत्तम मार्ग मिळेल.
कुंभ – आजचा प्रवास सुंदर होईल असे दिसते तीर्थाटन कुलदैवत इत्यादी यात्रा होतील. अध्यात्मिक अभ्यास करण्याची इच्छा होईल. उच्च शिक्षणासाठी उत्तम मार्गदर्शन मिळेल. ईश्वरकृपेचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करावा.
मीन – आपली कामे तर होतील. परंतु महत्त्वाकांक्षा थोडी कमी जाणवेल. असे असले तरी देखील कुठेही आपले मन अस्वस्थ होणार नाही त्यामुळे काळजी नसावी. आरोग्य सांभाळावे,अधिक कामामुळे ताण येऊ शकतो.