IND vs BAN T20: 14 वर्षानंतर ग्वाल्हेरमध्ये आंतरराष्ट्रीय सामना; बांगलादेशची वाढवली सुरक्षा व्यवस्था!

Sports : भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर आजपासून दोघांमधील टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. ग्वाल्हेरच्या नव्याने बांधलेल्या माधवराव सिंधिया स्टेडियमवर संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू होईल. १४ वर्षांनंतर शहरात आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याचे समजते.

दरम्यान, भारताचा अष्टपैलू शिवम दुबे दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहे. त्याच्या जागी फलंदाज तिलक वर्मा संघात सामील झाला. T-२० मध्ये पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच भारताचे नेतृत्व करणार आहे.

नवीन स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना!

भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना आज होत आहे. ग्वाल्हेरच्या नवीन स्टेडियमवर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानात लाल मातीची खेळपट्टी आहे. जी चांगली उसळी आणि वेगवान गोलंदाजासाठी फायदेशीर मानली जाते. मालिकेतील पहिला सामना आज याआधी दोन्ही संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळले होते. सामन्याच्या सुरुवातीला गोलंदाजांना चांगली मदत मिळू शकते, पण जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी फलंदाजांसाठी फलंदाजी सोपी होत जाईल.

हवामान कसे असेल?

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्याच्या वेळी पावसामुळे बराच व्यत्यय आला होता. याच कारणांमुळे T-२० मालिका सुरू होण्यापूर्वी सर्वांच्या नजरा हवामान अंदाजाकडे लागल्या आहेत. एक्यूवेदरनुसार, श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये ६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी हवामान स्वच्छ असेल. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही.

बांगलादेशची सुरक्षा व्यवस्था वाढवली!

बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ सामना रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अशातच ग्वाल्हेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेची खबरदारी घेतली आहे. सामन्यात कोणतीही गडबड होऊ नये, यासाठी कलम १६३ देखील लागू करण्यात आले आहे. यानुसार सामन्यात कोणतेही निषेध व्यक्त करणारे फोटो बॅनर घेऊन जाता येणार नाही.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन!

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कॅप्टन), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि मयंक यादव.

टीम बांगलादेशची संभाव्य प्लेइंग इलेव्हन!

नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तन्झीद हसन तमीम, परवेझ हुसेन आमोन, तौहीद हृदोय, महमूद उल्लाह, लिटन कुमेर दास, जाकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन.