Horoscope today 5 October 2024: आज नवरात्रीची तिसरी माळ; कुणासाठी असणार आजचा शनिवार खास? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

शारदीय नवरात्रीला सुरुवात झाली आहे. आज नवरात्रीची तिसरी माळ आहे. आजच्या दिवशी देवी चंद्रघंटाच्या रुपाची पूजा केली जाते. हा दिवस अनेक राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी शनिवारचा दिवस कसा असणार?

मेष

प्रवास तथा महत्त्वाची कार्ये होऊ शकतील, उच्च शिक्षणासंदर्भात मार्ग मिळू शकतील. वाहनसुख लाभेल. काही देवकार्य घडतील. धार्मिक कर्म करण्याची इच्छा होण्याची शक्यता, साधारण प्रसन्न तथा सुखद दिवस असेल.

वृषभ

व्यवसाय/नोकरी संदर्भात स्पीड जरी कमी असेल तरीही लाभ मात्र उत्तम होण्याची शक्यता. कामासंदर्भात जवळचे प्रवास घडू शकतील. बिझनेस मधून छान लाभ आहे. पितृसुख मिळेल, सुंदर कार्य घडतील, खरेदी करण्यास हरकत नाही.

मिथून

आज अधिक प्रयत्नातून उत्तम लाभ मिळू शकेल. मनापासून कार्ये करा. लाभदायक प्रवास असतील तरीही वाहने सावकाश चालवावित. प्रिय मित्रांची भेट होऊ शकते. महत्त्वपूर्ण वस्तू प्राप्त देखील होऊ शकते. फसवणुक होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावधानता बाळगावी.

कर्क

व्यवसायात/नोकरीच्या ठिकाणी कितीही काम केले तरी व्यर्थ जात आहे असे वाटत असेल तर ते चुकीचे आहे. काही काळातच उत्तम लाभ दर्शवत आहे. त्यामुळे असे विचार करून मानसिक स्थिती बिघडवून घेऊ नये. आरोग्य सांभाळावे.

सिंह

प्रसन्नतेचे भाव निर्माण होण्याची शक्यता. कौटुंबिक सुख प्राप्त होऊ शकते. आवडत्या नातेवाईकांची भेट होईल. खर्च वगैरे होतील परंतु चांगल्या ठिकाणी होईल. बाहेरील द्रव्य पदार्थ खाणे टाळावे, आरोग्याची काळजी असावी.

कन्या

धनप्राप्तीसाठी कष्ट तर घ्यावेच लागतील परंतु स्वधिकाराने धनप्राप्तीचे सुख आज मिळण्याची शक्यता. खर्च मात्र जपुन करावा त्यात आपले नियंत्रण नसेल. आरोग्य सांभाळणे कारण दवाखाना होण्याची शक्यता दिसते. द्विधा मनस्थिती होत असल्यास योग, सूर्योपासना करावी.

तूळ

शेजार किंवा जवळच्या लोकांकडून उत्तम लाभ दिसतो. काहीतरी नवीन कार्ये करण्याची इच्छा जागृत होऊ शकते. सुंदर प्रवास घडेल, खाण्यापिण्याच्या संदर्भात सुख प्राप्त होईल. वाहन सुख आहे, साधारण सुखद दिवस असेल.

वृश्चिक

घरामध्ये चांगल्या घटना घडू शकतील. आज साधारण घरातच अधिक सुख प्राप्त होईल. घरातील लोकांसाठी खर्च होऊ शकतो. प्रसन्नता तथा शांतता, आनंद प्राप्त होऊ शकते. उत्तम प्रकारे विषेश अभ्यास आज होईल. घरची कामे उत्तम प्रकारे होतील.

धनु

बहिण/भावंडे यांच्या कडून काहीतरी लाभ दिसतो. स्नेही जनांची भेट होईल, आजच्या कामात उत्तम यश तथा नफा मिळण्याची शक्यता. शेजारी तथा जवळच्या नातेवाईकांकडून मदत तथा लाभ मिळू शकतो.

मकर

जरा विश्रांती घ्या कारण तुमचे थोडे काम कमी होण्याची शक्यता आहे अर्थात तुमचे काही काम समोरचा व्यक्ती करेल. ताणतणाव थोडा कमी जाणवेल, मानसिक दृष्ट्या सुख अनुभवाल, आरोग्य मात्र सांभाळावे दूषित पाण्याने आजार होण्याची शक्यता आहे.

कुंभ

स्त्रीकडून मदत घेतल्याने कार्य पूर्ण होतील. पत्नीकडून लाभ, व्यवसायाच्या ठिकाणी छान फायदा होण्याची शक्यता. कोर्टकचेरी किंवा पार्टनरशिप या संदर्भात निर्णय घेऊ नये. बदलीसाठी छान दिवस. प्रवास देखील उत्तम होऊ शकतो.

मीन

सर्वप्रथम तर आज वाहने लक्षपूर्वक चालवावीत. महत्त्वाकांक्षा कमी होऊ देऊ नका. मन परिवर्तन न झाल्याने नियमित असलेले कार्य निश्चितच पूर्ण होण्याची शक्यता. परंतु मानसिक स्थिती ठीक नसेल तर कार्य अपूर्ण राहण्याची संभावना दिसते. त्यामुळे झालेल्या गोष्टी विसरण्यातच सुख आहे.