‘बॉर्डर 2’ मध्ये सनी देओलसोबत दिसणार ‘ज्युनियर शेट्टी’; या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित!

बॉलिवूड : बॉलीवूडमध्ये जेव्हा जेव्हा ॲक्शन चित्रपटांची चर्चा होते तेव्हा सनी देओलच्या हिट चित्रपट बॉर्डरचे नाव नक्कीच डोळ्यासमोर येते. आता २७ वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हळूहळू या चित्रपटातील कलाकारदेखील समोर येत आहेत. वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्यानंतर आता आणखी एका सैनिकाने यात प्रवेश केला आहे.

दरम्यान, ‘बॉर्डर’ चित्रपटाच्या यशानंतर जेपी दत्ता यांनी ‘बॉर्डर २’ चित्रपटाची घोषणा केली होती. आता २७ वर्षांनंतर अनुराग सिंग दिग्दर्शित ‘बॉर्डर २’ मोठ्या पडद्यावर परतत आहे.

‘बॉर्डर २’ मध्ये या कलाकाराचा समावेश!

या चित्रपटात सनी देओल सोबत आयुष्मान खुराना सैनिकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची बातमी होती. मात्र, या बातमीत तथ्य नव्हते. यानंतर सनी देओलने अधिकृतपणे घोषणा केली की वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ या चित्रपटाचा भाग असतील. तसेच, आता या चित्रपटात चौथा शिपाई दाखल झाला आहे. ‘बॉर्डर’ चित्रपटात सुनील शेट्टीने भैरव सिंहची भूमिका साकारली होती. आता ‘बॉर्डर २’ मध्ये त्याच्या जागी अहान शेट्टी दिसणार आहे. याबाबत स्वतः सनी देओलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर अधिकृत माहिती शेअर केली आहे. दरम्यान, चाहते आता बॉर्डर चित्रपटाचा सिक्वेल पाहण्यास आतुर झाले आहे.

चित्रपट कधी होणार प्रदर्शित!

‘बॉर्डर २’ हा चित्रपट २०२६ मध्ये २३ जानेवारीला रिलीज होणार आहे. जेपी दत्ता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत नसून या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता करणार आहेत. यावेळीही चित्रपटाची कथा किंवा त्याचा काही भाग भारत आणि पाकिस्तानमधील परस्पर युद्धावर आधारित असण्याची शकता आहे. त्यामुळे बॉर्डर चित्रपटानंतर ‘बॉर्डर २’ पाहण्याची चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

अहान शेट्टीच्या आवाजातील खास व्हिडीओ!

बॉर्डर चित्रपटाच्या निर्मात्यांनी गुरुवारी अहानच्या नावाची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी बॉर्डर २ च्या टीममध्ये अहानचे स्वागत करणारा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओची सुरुवात ‘बॉर्डर’ चित्रपटातील सनी देओलच्या भूमिकेच्या फोटोने होते. यानंतर अहान शेट्टीच्या आवाजात एक डायलॉग ऐकू येतो.

या चित्रपटातून अहानचे बॉलिवूडमध्ये पदार्पण!

अहान शेट्टीबद्दल बोलायचे झाले तर त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. अभिनेत्री तारा सुतारिया हिच्यासोबत अहान याने ‘तडप’ सिनेमात स्क्रिन शेअर केली आहे. याशिवाय, तो खाजगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतो. अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ गेल्या ११ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण, त्यांचे नात तुटले. अहान आणि तानिया यांच्यामध्ये दुरावा का निर्माण झाला? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.