ऑनलाइन डिजिटल पेमेंट ही आता रोजची गरज बनली आहे आणि लाखो लोक दर मिनिटाला UPI पेमेंट करतात. तसेच, जर तुम्हाला सेल्युलर नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळत नसेल किंवा इंटरनेट काम करत नसेल तर ऑनलाइन पेमेंटबद्दल काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील UPI पेमेंट करू शकता आणि ते कसे करायचे याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या?
दरम्यान, UPI Lite द्वारे इंटरनेटशिवाय पेमेंट देखील करू शकता. तुम्ही PhonePe, GooglePay, Paytm किंवा BHIM सारख्या कोणत्याही ॲपमध्ये UPI Lite सेट करू शकता. UPI Lite द्वारे एका दिवसात जास्तीत जास्त २,००० रुपये भरता येतात.
इंटरनेटशिवाय UPI पेमेंट कसे करावे?
इंटरनेटशिवाय तुमच्या फोनवरून UPI पेमेंट करण्यासाठी, तुम्ही USSD कोड वापरून पेमेंट करू शकता. यूएसएसडी कोड वापरून तुम्ही Android, iOS सारख्या कोणत्याही फोनवरून ऑफलाइन पेमेंट करू शकता.
काय आहेत पायऱ्या जाणून घ्या?
१. सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये फोन डायलर उघडा आणि *99# डायल करा.
२. आता तुम्हाला भाषा निवडण्याचा पर्याय दिसेल, त्यानुसार तुमची भाषा निवडा.
३. यानंतर तुमचा खाते क्रमांक आणि IFSC कोड प्रविष्ट करा.
४. तुम्हाला ज्या नंबरवर पेमेंट करायचे आहे तो नंबर एंटर करा.
६. तुम्हाला पाठवायची असलेली रक्कम प्रविष्ट करा आणि पाठवा पर्यायावर क्लिक करा.
७. शेवटी तुमचा UPI पिन टाका.
फीचर फोनवरून कसे कराल पेमेंट?
तुम्हाला हवे असल्यास यूपीआय पेमेंट करण्यासाठी फीचर फोनदेखील वापरू शकता. एनपीसीआयच्या म्हणण्यानुसार, आयव्हीआर नंबरच्या माध्यमातून तुम्ही फीचर फोनवरून यूपीआय पेमेंट करू शकता. यासाठी 6366200200, 080-45163666 आणि 08045163581 नंबरवर कॉल करून यूपीआय आयडीची पडताळणी करावी लागेल. ज्यानंतर तुम्ही युएसएसडी कोड वापरून पेमेंट करू शकता.