Horoscope today 30 September 2024: आज सोमवार असून, हा दिवस भगवान शंकराला समर्पित केला जातो; त्यामुळे कुणावर राहणार शंकराची कृपा? जाणून घ्या राशिभविष्यातून!

आज ३० सप्टेंबर सोमवार असून, आजचा दिवस भगवान शंकराला समर्पित केला जातो. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. भोलेनाथ शंकराची पूजा केल्याने सर्व समस्यातून मुक्ती मिळते आणि जीवनता सुख-समृद्धी नांदते. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी सोमवारचा दिवस कसा असणार?

मेष राशी

कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात राहण्याची शक्यता. आर्थिक खर्चात वाढ देखील होण्याची शक्यता.

वृषभ राशी

शैक्षणिक कार्यात समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांना मेहनत घ्यावी लागेल. प्रवासाचा योग येऊ शकतो. कुटुंबात मांगलिक कार्य होतील. मित्रांचे सहकार्य मिळू शकते.

मिथुन राशी

खूप मेहनत घ्यावी लागू शकते. आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचे सहकार्य मिळू शकते. खूप जास्त खर्च होण्याची शक्यता. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील. धार्मिक कार्यात वाढ होईल.

कर्क राशी

वादविवादांपासून दूर राहा. कुटुंबात शांतता ठेवा. आईला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळण्याची शक्यता.

सिंह राशी

नोकरीत अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. क्रोधावर नियंत्रण ठेवा. खर्चामुळे नैराश्य येऊ शकते. एखाद्या मित्राच्या सहयोगामुळे महत्त्वाचे काम होऊ शकते.

कन्या राशी

आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात खूप मेहनत घ्यावी लागू शकते. आरोग्याची काळजी घ्या. धार्मिक कार्यात व्यस्त राहू शकता.

तुळ राशी

आशा-निराशेचे भाव मनात येऊ शकतात. नोकरीत प्रगती होईल. कुटुंबापासून दूर जाऊ शकता. आत्मविश्वास कमी होईल. संवादात समतोल ठेवा.

वृश्चिक राशी

मन अशांत राहील. आत्मविश्वासात कमी राहील. विनाकारण क्रोधी होऊ नका. कामकाजासाठी प्रवास करावा लागू शकतो. आर्थिक खर्चात वाढ होऊ शकते. कुटुंबाचं सहकार्य लाभेल. आईच्या सहकार्यामुळे धनप्राप्ती होण्याची शक्यता.

धनु राशी

आत्मविश्वास वाढेल. मन अस्वस्थ राहील. क्रोधापासून सावध राहा. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आशा-निराशेचे संमिश्र भाव राहतील.

मकर राशी

आत्मविश्वास खूप वाढेल. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. स्वभावात चिडचीडपणा राहू शकते. आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता.

कुंभ राशी

मन अस्वस्थ राहील. पार्टनरच्या आरोग्याची काळजी घ्या. खूप मेहनत करावी लागू शकते. आई-वडिलांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

मीन राशी

मानसिक आरोग्य चांगले राहील. एखादे आर्थिक काम होईल. कुटुंबात सुख-समृद्धी राहील. कुटुंबासोबत धार्मिक स्थळांवर जाऊ शकता.