शाहरुख खानने जिंकला ‘जवान’ मधील अभिनयासाठी IIFA 2024 चा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ पुरस्कार!

अबू धाबी : सध्या अबू धाबीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठा अवॉर्ड शो आयफा २०२४ पार पडत आहे. शनिवारी (२८ सप्टेंबर) या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

दरम्यान, शाहरुख खानपासून राणी मुखर्जीपर्यंत अनेक कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे. विजेत्यांच्या घोषणेने स्टार्सचा जल्लोष शिगेला पोहोचला होता. IIFA २०२४ मध्ये, शाहरुख खानने ‘जवान’ मधील त्याच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. तर बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री राणी मुखर्जीने ‘मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे’ मधील तिच्या उत्कृष्ट भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला. त्याचबरोबर रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटाने देखील अनेक पुरस्कार पटकावले आहेत.

IIFA Awards २०२४ विजेत्यांची संपूर्ण यादी!

बेस्ट फिल्म- अ‍ॅनिमल
बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर- अनिल कपूर (अ‍ॅनिमल)
बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस- शबाना आजमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
बेस्ट अ‍ॅक्टर- शाहरुख खान (जवान)
बेस्ट अ‍ॅक्ट्रेस- राणी मुखर्जी (मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे)
बेस्ट एक्टर इन नेगेटिव रोल- बॉबी देओल (अ‍ॅनिमल)
आउटस्टैंडिंग कॉन्ट्रीब्यूशन टू इंडियन सिनेमा- जयंतीलाल गड़ा, हेमा मालिनी
अचीवमेंट ऑन कंप्लीटिंग 25 ईयर्स इन सिनेमा- करण जोहर
बेस्ट म्यूझिक- अ‍ॅनिमल
बेस्ट लिरिक्स- सिद्धार्थ-गरिमा (अ‍ॅनिमल सॉन्ग सतरंगा)
बेस्ट सिंगर मेल- भूपिंदर बब्बल (अ‍ॅनिमल सॉन्ग अर्जन वेली)
बेस्ट डायरेक्टर- विधु विनोद चोपड़ा (12th फेल)
बेस्ट स्टोरी- रॉकी और रानी की प्रेम कहानी
बेस्ट स्टोरी (एडेप्टेड)- 12th फेल
बेस्ट सिंगर फीमेल- शिल्पा राव (जवान सॉन्ग चलेया)

IIFA २०२४ चा समारोप २९ सप्टेंबरला!

दरम्यान, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या दक्षिण भारतीय चित्रपट उद्योगाला समर्पित कार्यक्रम IIFA या तीन दिवसीय महोत्सवाची सुरुवात २७ सप्टेंबर रोजी झाली. IIFA २०२४ चा समारोप २९ सप्टेंबर रोजी IIFA Rocks सह होणार आहे. हनी सिंग, शिल्पा राव आणि शंकर-एहसान-लॉय सारखे कलाकार प्रेक्षकांसाठी लाईव्ह परफॉर्म करणार असल्याची माहिती मिळाली आहे.