शूटिंगसाठी सलमानची दिवसरात्र मेहनत; मात्र चित्रपट अभिषेकच्या खात्यात, नेमकं झाले तरी काय?

बॉलिवूड : सलमान खानने आयुष्यात अनेक चित्रपट नाकारले आहेत. पण असा एक चित्रपट होता जो सलमानने साइन केला आणि त्यासाठी त्याने रात्रंदिवस मेहनत केली, मात्र त्याला या चित्रपटात काम करता आले नाही. त्यानंतर निर्मात्यांनी चित्रपट बनवला आणि या सिनेमासाठी अभिषेक बच्चनला कास्ट करण्यात केले.

दरम्यान, हा चित्रपट रेमो डिसूझा दिग्दर्शित करत होता आणि या चित्रपटाची कथा डान्सवर आधारित होती. या चित्रपटाचे नाव ‘डान्सिंग डॅड’ होते. ही कथा होती एका वडिलांची. ज्यांना त्यांच्या मुलीला डान्सिंग रिॲलिटी शोमध्ये पाठवायचे होते. या चित्रपटात सलमान खानला वडिलांची भूमिका करायची होती आणि त्याने ती मान्य ही केली. मात्र सलमानला वाटले की तो डान्सवर आधारित सिनेमामध्ये काम करू शकणार नाही, आणि त्याने माघार घेतली.

अभिषेक बच्चनला सलमानचा चित्रपट मिळाला!

‘रेस ३’नंतर आता सलमान खान ‘डान्सिंग डॅड’ मध्ये काम करेल, असे रेमो डिसूझाला वाटत होते. पण तसे झाले नाही. त्यानंतर या चित्रपटासाठी अभिषेक बच्चनला कास्ट करण्यात आले. सध्या ‘डान्सिंग डॅडी’ या नावाने सुरू झालेल्या या चित्रपटाचे नाव बदलून आता ‘बी हॅप्पी’ असे ठेवण्यात आले आहे.

स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नृत्याचे प्रशिक्षण!

सलमान खाननेही या चित्रपटासाठी स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नृत्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, रमेश तौरानी एका नव्या चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन सलमानकडे आले. सलमानला त्यांना नकार द्यायचा नव्हता, म्हणूनच त्याने ‘डान्सिंग डॅड’ मध्येच थांबवून आधी रमेश तौरानीचा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट म्हणजे ‘रेस ३’ जो अपेक्षेस पात्र ठरला नाही आणि फ्लॉप झाला.

‘बी हॅप्पी’ प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित!

‘बी हॅप्पी’ या चित्रपटाची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली असून हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. मात्र , निर्मात्यांनी अद्यापही हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केलेली नाही. या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत अमिताभ बच्चन, हार्लीन सेठी, नोरा फतेही, जॉनी लिव्हर, इनायत वर्मा यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत.