मोहरीच्या तेलाने मालिश करण्याचे आहेत अनेक फायदे; महिलांसाठी फायदेशीर, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

मोहरीच्या तेलाचा (mustard oil) आजही बरेच लोक वापर करतात. स्वयंपाकापासून ते शरीराला मसाज करण्यापर्यंत आजही मोहरीचे तेल अनेक लोकांची पहिली पसंती आहे. पूर्वीच्या काळी लहान मुलांना मसाज करण्यासाठीही मोहरीचे तेल वापरले जायचे. या तेलाच्या फायद्यांमुळे, लोक त्याचा सतत वापर करतात. पण बदलत्या काळानुसार लोकांच्या सवयींमध्ये खूप बदल झाले आहेत. आजकाल ऑलिव्ह ऑईल आणि रिफाइंड ऑइलमुळे लोक मोहरीच्या तेलाचा वापर कमी करत आहेत.

दरम्यान, शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी मसाज हा एक उत्तम पर्याय आहे. मसाज केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. पण मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास दुहेरी फायदा होतो. मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि सांधे आणि स्नायूंच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो. तसेच, मोहरीच्या तेलामध्ये हेल्दी फॅट्स, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असते. जे शरीरासाठी फायदेशीर ठरते. तसेच यात ओमेगा ३ आणि ६ फॅटी अ‍ॅसिडही असते. या तेलाने त्वचा नॅचरल पद्धतीने मॉइश्चराईज होते. तळपायांना हे तेल लावून मालिश केल्याने शरीराला अनेक फायदेही मिळतात. चला तर मग जाणून घेऊया मोहरीच्या तेलाचे फायदे?

१) मोहरीच्या तेलाने मालिश करण्याचे फायदे!

मोहरीच्या तेलाला आयुर्वेदात आरोग्याच्या दृष्टीने फार महत्व आहे. याच्या सेवनासोबतच याने मालिश केल्याने मसल्सला आराम मिळतो. या तेलाने मालिश केल्याने शरीरातील ब्लड सर्कुलेशनही सुरळीत होते. रात्री तेलाने तळपायांनी मालिश केल्याने पायांना आराम मिळतो आणि मेंदुही रिलॅक्स होतो. ज्यामुळे तुम्हाला चांगली झोपही येते.

२) महिलांसाठी फायदेशीर!

ज्या महिलांना मासिक पाळीदरम्यान पोटात वेदना होतात, त्यांनी रात्री झोपण्याआधी तळपायांवर मोहरीच्या तेलाने मालिश करावी. याने मासिक पाळीतील वेदना कमी होतात आणि मसल्सना आरामही मिळतो.

३) झोप चांगली लागते!

ज्या लोकांना झोप न येण्याची म्हणजे इन्सोम्नियाची समस्या असते, त्यांच्यासाठी हे तेल खूप फायदेशीर ठरते. या लोकांनी रात्री झोपण्याआधी कोमट तेलाने तळपायांची मालिश करावी. यामुळे मानसिक तणाव दूर होतो आणि रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. जे लोक तणाव किंवा चिंतेचे शिकार आहेत त्यांनी रोज या तेलाने तळपायांची मालिश करावी.