आज २३ सप्टेंबर सोमवार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी असून षष्ठी तिथीचे श्राद्ध केले जाईल, त्यामुळे जाणून घ्या कसा असणार सोमवारचा दिवस? काय सांगतात तुमचे आजचे राशिभविष्य?
मेष राशी (Aries Daily Horoscope)
आजच्या दिवशी एखादे नवीन काम हाती घ्याल. तुम्हाला एखादा दूरचा प्रवास करावा लागू शकतो. घरात पूजाअर्चा आयोजित करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळू शकते. कुणाकडूनही पैसा उदार घेऊ नका. कारण या व्यवहारात तुम्ही फसण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत खास राहणार आहे. तुम्ही व्यवसायाशी संबंधित एखादी नवीन योजना आखू शकाल. तुमच्या आजूबाजूला वाद, झगडा झाला तर तुम्ही शांत राहा. तुमच्या आईच्या तब्येतीत चढउतार होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास आईच्या टेस्ट करून घ्या.
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी समस्या घेऊन येणारा असेल. नोकरदारांच्या समस्या मार्गी लागतील. व्यापारातील गुप्त गोष्टी कुणालाही सांगू नका. तुमचे हितशत्रू मित्राच्या रुपात येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासात पुरेपुर लक्ष द्यावे. नाही तर पुढे पश्चात्ताप होण्याची शक्यता आहे.
कर्क राशी (Cancer Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. तुम्ही ज्या कामात हात टाकाल, त्या कामात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता. कुटुंबात आज एखाद्या कारणामुळे खटपट होण्याची शक्यता आहे. नोकरीत असणाऱ्यांना सहकाऱ्यांचा त्रास होईल. तुमच्या विरोधकांच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. एखाद्या कामाची सुरुवात केली तर ते पूर्ण करूनच सोडा.
सिंह राशी (Leo Daily Horoscope)
आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहण्यासाठी चांगला आहे. तुमच्या मेहनतीमुळे तुम्हाला यश मिळण्याची शक्यता. आज तुम्ही तुमच्या आईकडे मनातील गोष्ट सांगाल. तुमच्या व्यवसायात कुणाला पार्टनर बनवू नका. नाही तर तुमची मोठी फसवणूक होण्याची शक्यता आहे. तुमच्या एखाद्या मित्राला मदत करण्यासाठी तुम्हाला पैसा जमवावा लागणार आहे. तुम्ही छोट्यामोठ्या गोष्टींच्या योजनांच्या लाभावर लक्ष दिलं नाही तर तुमच्या हातून बऱ्याच संधी निघून जाण्याची शक्यता आहे.
कन्या राशी (Virgo Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी तणावग्रस्त राहणार आहे. तुमच्या आरोग्याकडे पूर्णपणे लक्ष द्या. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त राहाल. एखाद्या कामात काही अडचणी आल्या असतील तर त्यात गुंतून राहू नका. आईवडिलांची सेवा करण्यासाठी वेळ काढा. तुम्हाला तुमचं एखादे काम पूर्ण करण्यासाठी पैसे उधार घ्यावे लागणार आहे. एखाद्या कायदेशीर प्रकरणासाठी धावपळ वाढू शकते.
तुळ राशी (Libra Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा असणार आहे. तुमचे एखादे काम मार्गी लागल्याने तुम्हाला आज प्रचंड आनंद होणार आहे. एखाद्या जुन्या चुकीवर तुम्ही आज भाष्य कराल. एखाद्या कामाबाबत तुमच्या मनात जर काही संशय असेल तर ते काम पूर्ण करू नका. व्यवसायानिमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. नोकरीसाठी पैसा खर्च करणाऱ्यांना अडचणी येऊ शकतात.
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक राहणार आहे. तुमच्या कला कौशल्याने तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना खूश कराल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता चांगली असेल. तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे तुम्ही लक्ष द्या. प्रेमप्रसंगात वाद होतील. पण किरकोळ भांडणाकडे लक्ष देऊ नका. तुमच्या कामाबाबत सजग राहा. आईवडिलांच्या आशीर्वादाने तुमचे रखडलेले काम मार्गी लागण्याची शक्यता.
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)
आज तुम्हाला व्यवसायात एखादी मोठी डील करण्याची संधी मिळेल. पण कोणताही करार करताना विचारपूर्वकच निर्णय घ्या. तुमची आर्थिकस्थिती आधीपेक्षा चांगली होईल. तुम्हाला आनंद मिळेल. वडिलांसोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. तुमचा व्यापारात बुडालेला पैसा मिळू शकतो. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या करिअरची चिंता सतावेल. आज तुम्ही प्रचंड ऊर्जावान राहाल.
मकर राशी (Capricorn Daily Horoscope)
धाडस आणि पराक्रम गाजवणारा हा दिवस आहे. एखाद्या प्रकरणात विनाकारण डोकं घालू नका. तुमचे शत्रू तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. एखाद्या नव्या कामाची तुम्ही योजना बनवाल. तुम्ही प्रॉपर्टी डीलिंगचे काम करत असाल तर तुमची एखादी मोठी डील आज फायनल होणार आहे.
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope)
व्यवसायात तुमचा दिवस चांगला राहील. व्यवसायात तुम्ही मोठी आर्थिक गुंतवणूक कराल, त्याचा तुम्हाला फायदाच होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या कामात हात टाकाल त्या कामात तुम्हाला यश मिळेल. कुटुंबातील लोकांसोबत तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. एखाद्या वादविवादापासून दूर राहा. कार्यक्षेत्रातील लोकांशी बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमची तुमच्या मित्रासोबत बऱ्याच काळानंतर भेट होऊ शकते.
मीन राशी (Pisces Daily Horoscope)
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. विद्यार्थ्यांनी एखाद्या परीक्षेत भाग घेतला असेल तर त्यात त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला नवीन ओळख मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होण्याची शक्यता आहे.