नारळ पाणी पिल्याने अनेक फायदे होतात. कारण त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. त्यामुळे आजारी व्यक्तीला नारळ पाणी दिले जाते. नारळ पाणी प्रत्येक ऋतूत प्यायला हवे. नारळाचे पाणी केवळ हायड्रेशनच्या दृष्टीनेच नाही तर शरीराला पोषण देण्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे. तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर तुमच्यासाठी नारळ पाणी हा एक उत्तम पर्याय आहे. माहितीनुसार, नारळ पाणीमुळे रक्तातील साखरेची पातळी देखील कमी होते. नारळ पाणी मनुष्यासाठी खूप फायदेशीर आहे.
दरम्यान, नारळ पाणी तसे तर सगळ्यांसाठीच हेल्दी असते. मात्र, अनेक फायदे असूनही नारळ पाणी काही लोकांसाठी नुकसानकारक असते. त्यामुळे आरोग्यसंबंधित समस्या किंवा स्थितींमध्ये नारळ पाणी पिणे टाळले पाहिजे. तसेच, पोषण आणि चवदारपणा यामुळे नारळ पाणी सर्वांनाच गुणकारी वाटते, परंतु नारळ पाण्याचे जसे फायदे आहेत तसे काही नुकसानही आहेत. जाणून घेऊया नारळ
पिण्याचे फायदे आणि नुकसान.
नारळ पाण्याचे नुकसान काय?
१) डायबिटीज पीडित रूग्ण
जर तुम्ही डायबिटीजचे रूग्ण असाल तर नारळ पाणी पिणे टाळले पाहिजे. कारण नारळ पाण्यात नॅचरल शुगर असते, ज्यामुळे याचे सेवन केल्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.
२) किडनीची समस्या असेल तर…
नारळ पाण्यामध्ये हाय पोटॅशिअम असते. ज्यामुळे किडनीची समस्या असलेल्या लोकांसाठी हे नुकसानकारक ठरू शकते. किडनीची समस्या असलेल्या लोकांनी जर नारळ पाणी पिले तर त्यांना हायपरकेलेमिया होण्याचा धोका असतो.
३) हाय ब्लड प्रेशर असलेले…
नारळ पाण्यात सोडियमचे प्रमाणही भरपूर असते. याने ब्लड प्रेशर वाढू शकते. त्यामुळे हाय ब्लड प्रेशर कमी करण्याचे औषध घेणाऱ्या लोकांनी नारळ पाणी पिणे टाळले पाहिजे.
४) ज्यांची सर्जरी झाली आहे…
सर्जरी दरम्यान तसेच ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगर कंट्रोल करण्यात होणारी अडचण दूर करण्यासाठी ठरलेल्या सर्जरीच्या कमीत कमी एक आठवडाआधी नारळ पाणी पिणे बंद केले पाहिजे.
नारळ पाण्याचे फायदे काय?
१) त्वचेचे आजार
नारळाचे पाणी आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. नारळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडेंट असल्याने यामुळे सुरकत्या पडत नाहीत. नारळ पाणी त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. हे तुमच्या त्वचेचे संरक्षण करते. नारळ पाण्यात व्हिटॅमिन सी आणि ई देखील असतात जे त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.
२) किडनी स्टोन
किडनी स्टोन असलेल्या व्यक्तीला डॉक्टर भरपूर पाणी प्यायला सांगतात पण थोडे नारळाचे पाणीही प्यावे. कारण ते लघवीची वारंवारता वाढवते आणि दगड तयार करणाऱ्या खनिजांची एकाग्रता कमी करते. त्यामुळे किडनी स्टोनपासून लांब राहायचे असेल तर नारळाचे पाणी प्यायला हवे.
३) पचन चांगले होते
नारळाच्या पाण्यात फायबर मुबलक असते जे पचन सुधारण्यास मदत करते. यात एंजाइम देखील असतात जे तुम्ही खात असलेले अन्न बारीक करण्यास मदत करू शकतात. यामुळे पोटाचे आजार दूर राहतात.
४) रक्तदाब नियमन
नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास देखील मदत होते. उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हे खूप चांगले आहे. उच्च पोटॅशियम सामग्रीमुळे ते सोडियमच्या प्रभावांना संतुलित करण्यास मदत करते.