नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. सध्या, या नोकरीच्या भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. विशेष म्हणजे ही बंपर भरती आहे. तसेच, देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. ही संधी म्हणजे, CRPF मध्ये नोकरी मिळण्याची संधी आहे. यासाठी, जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.
दरम्यान, सीआरपीएफ (CRPF) कॉन्स्टेबल पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू असून, ५ सप्टेंबरपासून या नोकरीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १४ ऑक्टोबर २०२४ ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे.
कसे कराल अर्ज?
ssc.gov.in. या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावे लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून ११४५१ कॉन्स्टेबल पदे ही भरली जाणार आहेत. यामध्ये एकूण ११४५१ पदांपैकी १२९९ पदे पुरुष आणि एकूण २४२ पदे महिलांसाठी राखीव आहेत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आली आहे.
कोण करू शकतो अर्ज?
या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. यासोबतच १८ ते २३ वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. प्रथम लेखी परीक्षा घेतली जाईल. त्यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना पीईटी चाचणी, पीएसटी चाचणीही द्यावी लागेल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीही केली जाईल.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फीस द्यावी लागेल!
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रूपये फीस ही द्यावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना फीस देण्याचे टेन्शन नसणार आहे. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील चांगला मिळणार आहे. यात १८,००० रुपये ते ६९,१०० रुपये मासिक वेतन दिले जाईल. यासंबंधी कोणतेही माहिती किंवा अपडेट जाणून घेण्यासाठी, वेळोवेळी अधिकृत वेबसाइटला भेट देत रहा. दरम्यान, भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर उमेदवारांनी अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.