आज १८ सप्टेंबर असून भाद्रपद कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. आजपासून पितृपक्षाला सुरुवात होईल. चंद्र गुरु आणि मीन राशीत भ्रमण होईल. त्यामुळे आज उभयचारी योग, वृद्धी योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग तयार झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी बुधवारचा दिवस असणार?
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय खर्चिक असू शकतो. वडिलांच्या तब्बेतीबाबत शंका निर्माण होऊ शकते. आज मेष राशींसाठी मानसिक कष्टाचा दिवस ठरेल. सल्ला हा आहे की, आजचा दिवस अतिशय समजूतदारपणे घालवा. आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य पद्धतीने चांगला असेल. दिवसाच्या सुरुवातीलाच आज तुम्हाला कुटुंबातील व्यक्तीच्या व्यवहारामुळे मानसिक ताण जाणवू शकतो. खर्चाला आवर घाला कंट्रोल करणे महत्त्वाचे आहे. दुपारी आकस्मित लाभ होण्याची शक्यता.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. नोकरदार वर्गाने काळजी घ्यावी. व्यावसायिक क्षेत्रात चांगली कमाई होण्याची शक्यता. कामानिमित्त प्रवास दौरे होतील. परदेशी जाणाऱ्या लोकांनी आज विशेष प्रयत्न करावेत.
कर्क
कर्क राशीच्या लोकांनी आज तब्बेतीची काळजी घ्यावी. मानसिक ताण आणि तणावात आजचा दिवस जाणार जाऊ शकतो. आज संयमाने काम करा. भावंडांशी व्यवहार मानसिक कष्टाचा असेल. आजचा सल्ला असा असेल की, कानाने हलके राहू नये. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका.
सिंह
सिंह राशींसाठी आजचे ग्रह महत्त्वाचे आहेत. समाजात तुमच्या प्रभाव असेल तुमच्या कृतीने सन्मान वाढेल. आरोग्याबाबत थोडे सतर्क राहा कारण आजचा दिवस अथिशय महत्त्वाचा आहे. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल, सासरच्या मंडळींकडून आज प्रेम आणि सन्मान मिळण्याची शक्यता.
कन्या
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय सामान्य असेल. आरोग्याची काळजी घ्या. सर्दी, ताप, खोकल्यासारखे आजार डोकं वर करू शकतील. आज चुकीच्या पद्धतीने लाभ मिळवून घेण्याचा विचार मनात येईल. पण संयम बाळगा. वाहन चालवताना काळजी घ्या. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवा.
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी असेल. कुणाच्यातरी चुकीचा फटका तुम्हाला बसू शकतो. विरोधक आणि शत्रुंपासून सतर्क राहा. कौटुंबिक गोष्टींमध्ये आज खर्च होण्याची शक्यता. आर्थिक बाबींमध्ये ग्रह सांगतात की, अनेक दिवसांपासून अडकलेले धन आज मिळू शकतील.
वृश्चिक
वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. रखडलेले काम आज पूर्णत्वाला जाईल. मित्रांकडून आज अपेक्षित मदत मिळेल. लव लाइफचा विचार केला तर प्रिय व्यक्तीसोबत आज संवाद अतिशय सुंदर होण्याची शक्यता.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे. दिवसाचा दुसरा भाग अतिशय महत्त्वाचा असेल. भौतिक सुख सुविधांनी आजचा दिवस समृद्ध असू शकतो. दान धर्म करण्याचा विचार नक्की करा. वैवाहिक जीवनात अतिशय आनंद येऊ शकतो. कामानिमित्त आज प्रवास होऊ शकतो. हा प्रवास फायदेशीर ठरेल.
मकर
मकर राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कामाकडे लक्ष द्या. तब्बेतीची विशेष काळजी घ्यावी लागेल. बदलत्या वातावरणामुळे आज सर्दी खोकलाचा त्रास होऊ शकतो. धार्मिक कामात मन लागेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय व्यस्ततेचा असेल. दिवसाची सुरुवातच अगदी अनपेक्षित प्रवासाने होईल. कामात यश मिळेल. घरातील कुटुंबासोबत छान वेळ घालवा. कमाई चांगलीच होईल पण खर्च देखील तेवढाच वाढण्याची शक्यता.
मीन
मीन राशीचे ग्रह सांगतात की, आजचा दिवस शुभ असेल. कौटुंबिक जीवनात आत सुख आणि समाधान मिळेल. भावंडांसोबत आजचा दिवस घालवा. धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. दुपारनंतर थोडा आराम मिळेल.