आज १७ सप्टेंबर अनंत चतुर्दशी असून मंगळवार आहे. चंद्र-राहूची युती झाल्यामुळे ग्रहण योग तयार झाला आहे. तसेच चंद्रग्रहण असल्यामुळे काही राशींना सावध राहावे लागेल. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी असून या तिथीला अनंत चतुर्दशीचा सण साजरा केला जातो आणि श्राद्धही या दिवसापासून सुरू होते. चला तर मग जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा असणार?
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवस अनुकूल असणार आहे. नोकरीत प्रभाव असेल. प्रवास यशस्वी होणार होण्याची शक्यता. शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातून फायदा होऊ शकतो. परीक्षेत यश देखील मिळू शकते. तुम्ही कोणत्याही क्रीडा स्पर्धेत भाग घेत असाल तर तुम्ही त्यात विजयी होऊ शकता. आज बाप्पा तुमच्यावर प्रसन्न असणार आहेत.
वृषभ (Taurus Zodiac)
आज काही मोठे काम झाल्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहणार आहे मात्र घाई करु नका. वेळेचे भान ठेवून आज कोणतेही काम केल्यास त्याचे परिणाम सुखद होतील. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला फायदा होण्याची शक्यता. विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम मिळतील. तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत असाल. वैयक्तिक संबंधांमध्ये समन्वय ठेवा. तुमच्या जोडीदारामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता.
मिथुन (Gemini Zodiac)
आज तुम्हाला भेटवस्तू मिळणार आहे. नोकरीत तुमची स्थिती मजबूत असू शकते. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. समाजातील परिस्थिती सामान्य होणार. धार्मिक कार्यावर देवाच्या आशीर्वादांचा वर्षाव होईल. व्यवसायात अपेक्षेप्रमाणे फायदा होऊ शकतो. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. वडिलांचे सहकार्य मिळू शकते.
कर्क (Cancer Zodiac)
आज तुम्हाला प्रत्येक समस्येचे समाधान मिळेल. इतरांना वाईट वाटेल असे विनोद करू नका. नोकरीत तुम्हाला तुमच्या बॉसकडून जबाबदारी मिळेल, पण सहकाऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका. स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या. व्यवसायात सावध राहा, कोणाची फसवणूक होऊ शकते. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.
सिंह (Leo Zodiac)
आज धार्मिक यात्रा करणे फायदेशीर ठरेल. व्यवसायात परिस्थिती सामान्य राहील आणि नोकरीत सहकाऱ्यांकडून लाभ मिळण्याची शक्यता. कुटुंबाकडून सहकार्य मिळू शकते. आज खर्च जास्त होऊ शकतो. नात्यात सामान्य स्थिती राहील. आरोग्यामुळे आज त्रास होऊ शकतो.
कन्या (Virgo Zodiac)
आज मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. गमावलेली रक्कम परत मिळवता येईल. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत चिंतेत राहू शकता. तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला कामात अडचणी येऊ शकतात. व्यवसाय सामान्य राहील. तुमच्या पत्नीशी मतभेद होतील, मात्र तुम्ही हे प्रकरण शहाणपणाने सोडवाल. मित्रांच्या भेटीमुळे दिवस ताजेतवाने जाण्याची शक्यता.
तूळ (Libra Zodiac)
आजचा दिवस संमिश्र असणार आहे. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळणार आहे. तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत चिंतेत राहू शकता. बाहेर जाण्यापूर्वी खबरदारी घ्या आणि काळजीपूर्वक वाहन चालवा. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास आणि धांदल उडेल. नोकरीत यश मिळाल्याने कुटुंबातील आनंद द्विगुणित होण्याची शक्यता.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आजचा दिवस शुभ असणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार आहे. सामाजिक कार्यात रुची राहील. आर्थिक प्रगती सोबत आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरीत बढती आणि व्यवसायात लाभ होण्याची देखील शक्यता आहे. आरोग्य सर्वसाधारणपणे चांगले राहील. विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील. लोकांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे प्रत्येक काम सोपे होईल.
धनु (Sagittarius Zodiac)
आजचा दिवस चांगला जाणार आहे. अपूर्ण कामे पूर्ण होतील. सरकारी कामात प्रगती होण्याची शक्यता. नवीन करार केले जातील. तुम्हाला अपेक्षित नफा देखील मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील.
मकर (Capricorn Zodiac)
आज धार्मिक कार्यात व्यस्त राहाल. आज लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. यामुळे तुम्ही त्रस्त राहाल. तुमच्या मुलामुळे तुम्हाला आनंद जाणवेल. मुलाचा झेंडा अभ्यासात फडकण्याची शक्यता. नोकरी-व्यवसायात परिस्थिती सामान्य राहील. तब्येतीची चिंता सतत जाणवेल. तुम्ही तुमच्या आवडीच्या वस्तू घरबसल्या खरेदी करू शकता.
कुंभ (Aquarius Zodiac)
आज सावध राहा. दिवस नकारात्मक असू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे ठेवा. नोकरीत वेळ चांगला जाण्याची शक्यता. कुटुंबासाठी आनंदाचा काळ आहे. तब्येतीची चिंता राहील.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस संमिश्र असणार आहे. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळण्याची शक्यता. आज निरुपयोगी गोष्टींकडे लक्ष देऊ नका अन्यथा तुमचा राग कायम राहील. आज तुम्हाला कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक बाबतीत थोडी सुधारणा होईल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ संमिश्र राहील.