विजय थलपथी ठरला सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता; आगामी चित्रपटासाठी घतले तब्बल ‘इतके’ कोटी!

बॉलिवूड : दक्षिण भारतीय सुपरस्टार थलपथी विजयने (Thalapathy Vijay) अलीकडेच बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानलाही मागे टाकले आहे. ‘थलपती ६९’ या आगामी चित्रपटासाठी त्याने २७५ कोटी रुपये घेतले आहे. विजय थलपतीचे लागोपाठ अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर हीट झाले आहेत. या चित्रपटाला त्याच्या राजकारणातील एण्ट्री आधीचा शेवटचा चित्रपट म्हणून म्हणून पाहीले जाते. विजय थलपतीने घेतलेल्या मानधनाचा आकडा पाहता आजपर्यंत कुणीच इतके मानधन घेतलेले नाही.

दरम्यान, याआधी शाहरुख खान याला अलिकडील त्याच्या चित्रपटातून सर्वाधिक २५० कोटी रुपयांचे मानधन मिळाले होते. मात्र, आता २७५ कोटींचे मानधन घेत विजय थलपती सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.

विजय सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता!

बिगिल, बीस्ट, मास्टर आणि लिओ सारख्या यशस्वी चित्रपटांमुळे विजयची लोकप्रियता देशभरात वाढली आहे. थलपथी विजयला “द ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम” साठी २०० कोटी रुपये मानधन मिळाले होते. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर ३५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसेच आता, थलपथी विजय हा शाहरुख खान, सलमान खान, प्रभास, अल्लू अर्जुन, रजनीकांत आणि आमिर खान यांच्यापेक्षा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता बनला आहे.

राजकारणाला स्पर्श नसलेला चित्रपट!

‘थलपती ६९’ या चित्रपटाची घोषणा १३ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेता विजय थलपती हा दिग्दर्शक एच. विनोथ यांच्या सोबत काम करणार असल्याचे समजते. ‘थलपथी ६९’ हा एक संपूर्णपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा चित्रपट आहे. विजय थलपती राजकारणात प्रवेश करणार असला तरीही हा चित्रपट राजकीय विषयांना स्पर्श करणार नाही असे विनोथ यांनी चाहत्यांना वचन देताना म्हटले आहे.

सलग ७ चित्रपट ठरले ब्लॉकबस्टर!

विजयचे सलग ७ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले आहेत आणि त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर २००० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चेन्नईच्या नीलंकराई येथील कॅसुअरिना ड्राइव्ह रस्त्यावर समुद्राजवळ विजय याचा ८० कोटींचा आलिशान बंगला आहे. यासह तिरुवल्लूर, तिरुपोरूर, तिरुमाझीसाई आणि वंदलूर येथे अनेक त्याच्या मालमत्ता आहेत. वयाच्या १८ व्या वर्षी त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. ३१ वर्षांपासून विजय थलपती फिल्म इंडस्ट्री गाजवत आहे.