फुटबॉलपटू रोनाल्डोचे सोशल मीडियावर १ अब्ज फॉलोअर्स; चाहत्यांसाठी लिहिली भावनिक पोस्ट!

क्रिस्टियानो रोनाल्डोचे नाव अनेकदा अशा व्यक्तीलाही माहीत असते ज्याने फुटबॉल खेळला नाही किंवा तो पाहिला नाही. पोर्तुगालचे स्टार फुटबॉलपटू त्यांच्या चमकदार खेळासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. रोनाल्डोला सध्या फुटबॉल विश्वातील सर्वोत्तम खेळाडू म्हटले जाते. सोशल मीडियावरही त्याची चांगलीच पकड आहे. इंस्टाग्रामवर तर त्याचे जगातील सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. आता रोनाल्डोने सांगितले की त्याने सोशल मीडियावर (सर्व प्लॅटफॉर्मवर एकत्रित) १ अब्ज फॉलोअर्स पूर्ण केले आहेत.

दरम्यान, ट्विटरवर (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टमध्ये महान फुटबॉलपटूने त्याच्या १ अब्ज फॉलोअर्सची माहिती दिली. या खास प्रसंगी रोनाल्डोने त्याच्या चाहत्यांसाठी एक अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे.

रोनाल्डोने पोस्ट करत काय लिहिले?

आम्ही इतिहास रचला – १ बिलियन फॉलोअर्स! ही केवळ संख्या नाही, ती आमच्या सामायिक आवड, उत्साह आणि खेळ आणि त्यापलीकडे असलेल्या प्रेमाचा दाखला आहे. ‘मडेरा च्या रस्त्यांपासून ते जगातील सर्वात मोठ्या टप्प्यांपर्यंत, मी नेहमीच माझ्या कुटुंबासाठी आणि तुमच्यासाठी खेळलो आहे आणि आता आमच्यापैकी १ अब्ज लोक एकत्र उभे आहेत. प्रत्येक चढ-उतारात तुम्ही माझ्या सोबत होता. त्यामुळे हा प्रवास आमचा प्रवास आहे आणि आम्ही मिळून दाखवून दिले आहे की आम्ही काय साध्य करू शकतो याला मर्यादा नाही, असे तो म्हणाला. तसेच, या पोस्टमध्ये रोनाल्डो आपल्या सर्व चाहत्यांचे आभार मानत म्हणाला, ‘माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, तुमच्या समर्थनासाठी आणि माझ्या आयुष्याचा एक भाग बनल्याबद्दल धन्यवाद. सर्वोत्तम अजून येणे बाकी आहे आणि आम्ही पुढे जात राहू, जिंकत राहू आणि एकत्र इतिहास घडवत राहू.

नुकतेच एक YouTube चॅनेल तयार केले!

रोनाल्डोने अलीकडेच त्याचे यूट्यूब चॅनल तयार केले होते, तिथे सुद्धा त्याला रेकॉर्ड ब्रेकिंग सब्सक्राइबर्स मिळाले. त्याच्या YouTube चॅनेलसह, तो जवळजवळ दररोज एक किंवा दुसरा रेकॉर्ड मोडत होता. तसेच, यूट्यूब चॅनलवर त्याचे जवळपास ६.०५ कोटी सबस्क्राइबर्स आहेत. दरम्यान, फेसबुकवर १७० दशलक्ष फॉलोअर्स आहेत आणि X (पूर्वीचे ट्विटर) वर ११३ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.

९०० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू!

रोनाल्डो काही दिवसांपूर्वीच करिअरमध्ये ९०० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू ठरला आहे. पोर्तुगालच्या नेशन्स लीग सामन्यात एशियाविरुद्ध विजयी गोल करत त्याने ही कामगिरी केली आहे.