आज ७ सप्टेंबर, गणेश चतुर्थी असून विघ्नहर्ता घरोघरी विराजमान झाला असेल. प्रत्येक पुजेमध्ये ज्याला पहिला मान असा हा गजानन, त्याची कृपादृष्टी आज सगळ्या भक्तांवर कायम राहणार आहे. चला तर मग गणपती बाप्पा मोरया म्हणत, जाणून घेऊया आजचे राशीभविष्य!
मेष (Aries)
आज गणेश चतुर्थीच्या दिवशी परदेशी गमनाच्या संधी मिळू शकतात. यासोबतच, बौद्धिक आणि वैचारिक पात्रता देखील वाढण्याची शक्यता.
वृषभ (Taurus)
आज शुभ संयोग जुळून आला असून, महिलांच्या नवीन योजनांचे स्वागत होईल. एखाद्याशी पटकन ओळख करून घ्या.
मिथुन (Gemini)
आज मिथुन राशी वाल्यांनी तब्येतिकडे लक्ष द्यावे यासोबतच, एचबी कमी होणे, रक्तामध्ये दोष, पायाची दुखणे यापासून सावधानता बाळगावी.
कर्क (Cancer)
आज कर्क राशी वाल्यांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नोकरी व्यवसायात प्रचंड धाडसाने विरोधकांचा सामना करा.
सिंह (Leo)
सिंह राशी वाल्यांपैकी ज्यांना नवीन नोकरी शोधायची आहे त्यांनी आज प्रयत्न करायला हरकत नाही.
कन्या (Virgo)
आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर खूप दिवसानंतर आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता. पैसे मिळण्याचे अनेक मार्ग खुले होऊ शकतात.
तुळ (Libra)
आजच्या दिवशी पूर्वी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल फक्त कष्ट जबरदस्त करावे लागणार आहेत.
वृश्चिक (Scorpio)
आज वृश्चिक राशी वाल्यांनी एखाद्या गोष्टीत यशाची ताबडतोब अपेक्षा करणे चुकीचे ठरू शकते. त्यामुळे काळजी घ्या.
धनु (Scorpio)
आज थोडे नोकरी व्यवसाय स्पर्धेला तोंड द्यावे लागू शकते. यासाठी स्वतःमध्ये सुधारणा करणे जास्ती महत्त्वाचे ठरेल.
मकर (Capricorn)
आज विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे फार लक्ष द्यावे. तसेच, चतुर्थीच्या दिवशी माणसांना आकर्षित करा.
कुंभ (Aquarius)
आज कुंभ राशी वाल्यांना आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सुधारणा करायला हवी, असे सारखे वाटत राहू शकते.
मीन (Pisces)
आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर मीन राशी वाल्यांनी जोडीदाराला निश्चित वेळ द्या.