आज ६ सप्टेंबर भाद्रपद तृतीया शुक्रवार आहे. आज हरतालिकेचे व्रत असून रवियोग आणि बुधादित्य योग जुळून आला आहे. तसेच नवपंचम योगासह हस्त आणि चित्रा नक्षत्र असणार आहे. त्यामुळे आजचा दिवस काही राशींना शुभ ठरेल, तर जाणून घ्या मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी शुक्रवारचा दिवस कसा असणार?
मेष
आज कोणताही निर्णय घाईने घेऊ नका, अन्यथा तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. चांगले कामही बिघडू शकते. नोकरी व्यवसायात कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केल्यास नुकसान होईल. पैशांबाबत वाद होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे वर्तन चुकीचे असू शकते. कुटुंबाकडून कठीण परिस्थितीत साथ मिळेल.
वृषभ
आज समाजात तुमचा मान-सन्मान वाढण्याची शक्यता. तुम्ही काम केले नाही तरी व्यक्तीमत्त्व उंचावेल. तुमच्यात अहंकाराची भावना जागृत होऊ शकते. बुद्धीमत्ता आणि चातुर्याने नफा मिळवा. सहकाऱ्यांच्या जास्त दबावामुळे एकट्याने काम करावे लागू शकते. आरोग्य चांगले राहिल.
मिथुन
आज यशाचा दिवस मात्र यशाचा संबंध पैशांशी जोडू नका, अन्यथा दु:खी होऊ शकता. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला असेल. आज तुम्ही व्यावहारिक राहाल. उच्च वर्गातील लोकांशी संपर्कात आल्यामुळे अभिमान येईल. कामाच्या ठिकाणी सरकारी मदत मिळवण्यासाठी दिवस चांगला ठरू शकतो.
कर्क
आजचा दिवस आध्यात्मिक दृष्टिकोनातून चांगला असेल. धार्मिक कार्यात तुमची भक्ती राहिल. दानधर्म करण्याची संधी मिळू शकते. भविष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात फायदा मिळण्याची शक्यता. तुम्हाला खर्च करण्यायोग्य उत्पन्न मिळेल. मिळालेल्या पैशात तुम्हाला समाधानी राहावे लागेल.
सिंह
आजचा दिवस संमिश्र परिणामाचा असेल. कोणतेही काम करायचे ठरवले तरी त्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता. सरकारी किंवा इतर आर्थिक कारणांमुळे काम रखडू शकते. कामाच्या ठिकाणी विरुद्ध बाजू पाहायला मिळतील.
कन्या
आज दिवसाची सुरुवात ऊर्जेने भरलेली राहिल. आरोग्य चांगले असले तरी आळस दूर होणार नाही. कामात दुपारनंतर गंभीर व्हाल. कामाच्या ठिकाणी यश मिळू शकते. पैशांच्या प्रवाहात सुधारणा होण्याची शक्यता. दैनंदिन खर्च सहज भरून निघतील. भविष्यासाठी बचत करा. नवीन व्यवसायात गुंतवणूक करणे शुभ ठरेल. इच्छा पूर्ण होण्यास विलंब होईल.
तूळ
आजचा दिवस भरभराटीचा असेल. दिवसाच्या सुरुवातीला महत्त्वाच्या कामावर निर्णय घ्या. नोकरी-व्यवसायात नशिबाची साथ मिळू शकते. समाधानकारक नफा मिळाल्याने आनंदी असाल. छोट्या- छोट्या गोष्टींवर वाद घालणे टाळा. भविष्यात नातेसंबंधांवर परिणाम होऊ शकतो.
वृश्चिक
आज तुमच्या व्यक्तिमत्वात विकास होईल. विचारपूर्वक कामे करा. बोलण्यात गोडवा राहिल. मनातील कटुता मिटण्याची शक्यता. कार्यक्षेत्रात जुन्या गोष्टींमुळे अडचणी येऊ शकतात. विवेकबुद्धीमुळे परिस्थिती गंभीर होईल. व्यवसायात हुशारीने नफा कमवा.
धनु
आजचा दिवस प्रतिकूल राहिल. घरच्यांकडून विनाकारण ऐकावे लागू शकते. स्वभावात अहंकार निर्माण होऊ शकतो. परिस्थितीला विरोध करू नका. कामाच्या ठिकाणी मानसिक दडपण येऊ शकते. योग्य वाटणारे निर्णय चुकीचे ठरतील. पैशाशी संबंधित व्यवहारात सावध राहा.
मकर
आज तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ कार्यात तुम्हाला मानसिक तणावापासून मुक्त राहावे लागेल. कामाच्या ठिकाणी कमी कष्टाने फायदा होण्याची शक्यता. नोकरदार लोक अतिरिक्त उत्पन्नासाठी वेगळे मार्ग निवडतील. घाईने निर्णय घेणे टाळा, आर्थिक लाभ उशीरा मिळतील. व्यवसाय वाढीसाठी प्रतिक्षा करावी लागेल.
कुंभ
आज तुम्हाला काही कमतरता जाणवेल. परिस्थितीनुसार स्वत:ला जुळवून घ्या. स्वभावात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करा. मनातील इच्छांना मारल्याने आंतरिक दु:ख होईल. परोपकार आणि अध्यात्माच्या भावनेमुळे काम सोडून इतरांना मदत करा. कामातून फायद्याची अपेक्षा कमी राहिल. पैसे मिळाल्यानंतर मन आनंदी राहिल.
मीन
आज तुम्ही खूप अपेक्षा कराल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. तुमचे मन उदास राहू शकते. तुमच्या लहरी वर्तनामुळे तुमच्या प्रियजनांसोबतच्या नात्यात कटुता येईल. मनाची चंचलचा तुम्हाला योग्य लाभापासून दूर ठेवेल.