जिओने युजर्ससाठी नवीन टू इन वन (2 in 1) ऑफर सादर केली आहे. जिओची ही ऑफर एयर फायबर ब्रॉडबँड वापरकर्त्यांसाठी आहे. वापरकर्ते आता एका जीओ एयर फायबर ब्रॉडबँड कनेक्शनसह दोन टीव्हीवर जीओ टिव्ही वापरू शकतात. यासाठी, वापरकर्त्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत किंवा अतिरिक्त सेट-ऑप बॉक्स स्थापित करावा लागणार नाही. जिओच्या या ऑफरचा विशेषत: अशा वापरकर्त्यांना फायदा होईल ज्यांच्या घरी एकाच घरात दोन टीव्ही बसवले आहेत.
दरम्यान, या टू इन वन ऑफरचा लाभ जीओ एयर फायबरच्या सर्व प्लॅनसह घेतला जाऊ शकतो. वापरकर्त्यांना हा फायदा ५९९ रुपये, ८९९ रुपये किंवा त्यावरील प्लॅनमध्ये मिळेल. याशिवाय प्रीपेड वापरकर्ते ९९९ रुपये आणि त्यावरील प्लॅनमध्ये या ऑफरचा लाभ घेऊ शकतील.
जीओ टू इन वन ऑफर काय?
जीओची ही ऑफर जीओ एयर फायबरच्या नवीन आणि जुन्या वापरकर्त्यांसाठी आहे. या ऑफर अंतर्गत, वापरकर्ते त्यांच्या स्मार्ट टीव्हीमध्ये JioTV+ ॲप इन्स्टॉल करून ८०० हून अधिक डिजिटल टीव्ही चॅनेल विनामूल्य ॲक्सेस करू शकतील. याशिवाय, तुम्ही SonyLIV, Disney+ Hotstar, Zee5 सह १३ हून अधिक ओटीटी ॲप्समध्ये प्रवेश करू शकता. जीओ कनेक्शन घेतलेल्या वापरकर्त्यांना या नवीन टू इन वन ऑफरचा लाभ मिळेल.
दोन टीव्हीवर JioTV+ कसे चालवायचे?
सर्वात आधी स्मार्ट टीव्हीमध्ये JioTV+ ॲप इन्स्टॉल करा. यानंतर, जीओ फायबर किंवा जीओ एयर फायबर वर नोंदणीकृत मोबाइल नंबरसह ॲपमध्ये लॉग इन करा. मोबाईलवर मिळालेला OTP टाका. दोन्ही टीव्हीवर समान प्रक्रिया पुन्हा करा. अशा प्रकारे तुम्ही दोन टीव्हीवर ८०० हून अधिक डिजिटल टीव्ही चॅनेलचा लाभ घेऊ शकता. तसेच, ओटीटी ॲप्सचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना त्यांच्या स्मार्ट टीव्हीमध्ये ओटीटी ॲप इंस्टॉल करावे लागेल. यानंतर, जीओ एयर फायबर कनेक्शनसह नोंदणीकृत मोबाइल नंबरसह लॉग इन करा आणि त्याचे विनामूल्य लाभ घ्या.