हार्दिक पांड्या करतोय ‘या’ ब्रिटिश गायिकेला डेट? दोघांचेही एकाच लोकेशनवरून फोटो व्हायरल!

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टँकोव्हिच यांनी घटस्फोट घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडिया पेजवर याबाबत पोस्ट टाकून माहिती दिली होती. घटस्फोट घेतल्यानंतर नताशा ही परत आपल्या मायदेशी मुलगा अगस्त्यला घेऊन परतली. मात्र, हार्दिक आता सिंगल आयुष्य जगत आहे. अशातच हार्दिकबद्दल आता वेगळ्याच चर्चा रंगल्या आहेत. हार्दिक पांड्या पुन्हा प्रेमात पडला? असे बोलले जात आहे.

हार्दिकचे नाव अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya pande) सोबत काही जणांनी जोडले होते. अनंत अंबानीच्या लग्नात हे दोघेही एकत्र दिसल्याची चर्चा रंगली होती. मात्र या विषयावर दोघांनीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, श्रीलंका विरुद्धची सीरिज आटोपल्यानंतर हार्दिक पांड्या सध्या ग्रीसमध्ये सुट्टीचा आनंद घेतोय. त्याच्या ग्रीसमधील एका फोटोने तो जॅस्मिन वालिया (Jasmin Walia) या ब्रिटीश गायिकेला डेट करतो की काय? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

एकाच लोकेशनवरुन फोटो शेअर!

हार्दिक आणि जॅस्मिन यांनी ग्रीसमधील एकाच लोकेशनवरुन फोटो शेअर केला आहे. हा फोटो ग्रीसमधील एका सुंदर स्विमिंग पूलच्या जवळचा आहे. या दोघांच्याही फोटोचे बॅकग्राऊंड अगदी सारखे असल्याने ते एकाच ठिकाणी असून परस्परांना डेट करत आहेत असा अंदाज फॅन्स व्यक्त करत आहेत. दरम्यान, जॅस्मिन ने इंस्टाग्राम वरील हार्दिकचे अनेक पोस्ट लाईक केले आहेत. हार्दिकने ही तिच्या पोस्टला लाईक केले आहे, त्यामुळे दोघांनी परस्परांचे फोटो लाईक केल्याने सर्वत्र त्यांच्या अफेयर्सची चर्चा रंगलेली आहे. या चर्चेत किती सत्य आहे? हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे.

कोण आहे जॅस्मिन वालिया?

जॅस्मिन वालिया ही एक ब्रिटिश गायिका आणि टीव्ही स्टार आहे, जिची चर्चा म्युझिक इंडस्ट्रीपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र होते. जॅस्मिन हिने पहिल्यांदाच जॅक नाईटसोबत परफॉर्म केले आणि २०१८ मध्ये ‘सोनू के टीटू की स्वीटी’ या बॉलिवूड चित्रपटासाठी ‘बम डिगी डिगी बम’ या गाण्याचा रिमेक करण्यात आला, तेव्हा तिची लोकप्रियता अधिकच वाढली. जॅस्मिन सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असून, इंस्टाग्राम वर तिचे ६.४ लाख फॉलोअर्स आहेत.