आज नवमी तिथी असून इंद्रा योग आहे. तसेच, पतेती आणि बुधपूजन देखील आहे. त्यामुळे चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी बुधवारचा दिवस कसा आहे?
मेष (Aries Zodiac)
आजचा दिवस मेष राशीसाठी महत्त्वाचा असणार आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. घरी शुभ कार्य होतील पण त्यामध्ये काही अडथळ्यांना सामोरे जावे लागू शकते. कामाच्या ठिकाणी आनंदाची बातमी देखील मिळू शकते.
वृषभ (Taurus Zodiac)
कामाच्या ठिकाणी तुमचे सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. कुटुंबासाठी वेळ द्या. तुमच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. महत्त्वाची काम लक्षपूर्वक करा.
मिथुन (Gemini Zodiac)
आज शरीरासह मान-सन्मान हानी होण्याची शक्यता आहे. कामात खराब वागणूक असूनही, समाधानकारक आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
कर्क (Cancer Zodiac)
आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. तुम्हाला कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. मात्र ती दुपारच्या सुमारास पूर्ण झाल्यामुळे आनंद मिळू शकतो.
सिंह (Leo Zodiac)
सिंह राशीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरेल. सगळ्या गोष्टी मनासारख्या होतीलच असे नाही पण जे घडेल ते फायदेशीर ठरू शकते. मुलांसोबत वेळ घालवा. पत्नीच्या मनाचा विचार करुन निर्णय घ्या.
कन्या (Virgo Zodiac)
आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुपारपर्यंतचा काळ चांगला राहणार आहे. यानंतर आर्थिक लाभापेक्षा खर्च जास्त होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्ती किंवा इतर कारणांमुळे अहंकाराबाबत कुटुंबात संघर्ष होण्याची शक्यता आहे.
तूळ (Libra Zodiac)
तूळ राशीच्या लोकांनी आपली विशेष काळजी घ्या. आज आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. इतकेच नव्हे तर कामाच्या ठिकाणी देखील थोडा ताण जाणवू शकतो. या सगळ्याचा परिणाम कुटुंबावर होणार नाही याची काळजी घ्या.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आजचा दिवस संमिश्र परिणाम देणारा असणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुपारपर्यंतचा काळ चांगला राहणार आहे. यानंतर आर्थिक लाभापेक्षा खर्च जास्त होऊ शकतो. वडिलोपार्जित संपत्ती किंवा इतर कारणांमुळे अहंकाराबाबत कुटुंबात संघर्ष होण्याची शक्यता आहे.
धनु (Sagittarius Zodiac)
धनु राशीसाठी आजचा दिवस आनंदाचा असेल. दिवसभर मन प्रसन्न राहण्याची शक्यता. तुमच्या आनंदाचा विचार करा. कुटुंबासाठी छान वेळ घालवा. जुन्या व्यवहारांमधून फायदा होऊ शकतो.
मकर (Capricorn Zodiac)
काही वेळी चांगल्या गोष्टीसाठी वाट बघावी लागते. तोच आजचा दिवस आहे. मन दुःखी करु नका. काही गोष्टी आनंदाने स्वीकारा. तुमचा सन्मान वाढेल म्हणून तुम्हाला अभिमान वाटणार आहे.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजचा दिवस अनुकूल राहणार आहे. व्यापार किंवा सामाजिक क्षेत्रात फसवणूक होण्याची अधिक शक्यता आहे. पूर्ण झालेला करार अचानक रद्द केल्याने आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात.
मीन (Pisces Zodiac)
आजचा दिवस खास असेल. थोड शांत राहा कारण काही गोष्टी सोडण्यातच खरा अर्थ असतो. मुलांकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबासोबत छान वेळ घालवा. जोडीदारासोबतचे खास क्षण महत्त्वाचे ठरू शकतील.