आज श्रावण महिन्यातील दुसरा मंगळवार असून मंगळागौरीचे व्रत केले जाईल. तसेच अष्टमी तिथी असल्यामुळे आज दुर्गाष्टमी देखील आहे. त्यामुळे जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व १२ राशींसाठी मंगळवारचा दिवस कसा आहे?
मेष (Aries)
आजचा दिवस कामाच्या ठिकाणी थोडा कठिण असण्याची शक्यता. न डगमगता परिस्थितीला सामोरे जा. कुटुंबासाठी वेळ द्या.
वृषभ (Taurus)
आजच्या दिवशी नवी कामे हाती घेण्याची संधी आहे. साथीदारासोबतचे तुमचे संबंध चांगले असतील. पालक म्हणून जबाबदारी वाढेल.
मिथुन (Gemini)
आजच्या दिवशी जर एका निर्णयाच्या प्रतिक्षेत असाल तर धीर राखा आनंद मिळू शकतो. घेण्यादेण्याच्या बाबतीत तुम्हाला गंभीर राहायला हवे.
कर्क (Cancer)
आजच्या दिवशी कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. व्यापार वाढवण्याचे प्रयत्न करु नका. रोजच्या कामातील काही कामे पूर्ण होण्याची शक्यता.
सिंह (Leo)
आजच्या दिवशी तुम्ही तुमची वेगळी ओळख बनवण्यास सक्षम असाल. कोणत्या तरी मित्राला तुमचा सल्ला घेतल्याने मोठा फायदा होऊ शकतो.
कन्या (Virgo)
आजच्या दिवशी वैवाहीक आयुष्य चांगले राहील. तुम्ही स्वत:मध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करा. मुलांचा विचार करा.
तूळ (Libra)
या राशीच्या व्यक्तींनी कोणत्याही कामातून मागे हटू नका. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मदत मिळू शकते.
वृश्चिक (Scorpio)
आजच्या दिवशी सध्याच्या नोकरीमध्ये तुम्हाला जास्त जबाबदारी मिळू शकेल. न कंटाळता केलेल्या कामांना यश मिळण्याची शक्यता.
धनु (Sagittarius)
आजच्या दिवशी जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता. आजचा दिवस खास असणार.
मकर (Capricorn)
आजच्या दिवशी नव्या व्यक्तीसोबत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस चांगला असू शकतो.
कुंभ (Aquarius)
आजच्या दिवशी पालकांच्या गरजांचा विचार तुमच्याकडून होण्याची शक्यता. तसेच, मित्र परिवाराकडून लाभ होण्याची शक्यता.
मीन (Pisces)
आजचा दिवस मदत करण्याचा असू शकतो. या दिवशी सगळ्यांचा विचार तुमच्याकडून होईल. पण स्वतःला देखील महत्त्व द्या.