केळ खाण्याचे आहेत इतके फायदे; आरोग्यासाठी अती लाभदायक..जाणून घ्या!

इतर फळांच्या तुलनेत केळी खूप स्वस्त असतात. इतकंच नाही तर केळी प्रत्येक हंगामात आणि सर्वत्र सहज उपलब्ध असतात. केळी हे फळ झटपट ऊर्जा देण्यासाठी बेस्ट ऑप्शन मानले जाते. केळी व्हिटॅमिन्स व खनिजांनी समृद्ध असतात. तसेच, केळ हे असे फळ आहे जे आरोग्यासाठी अनेक दृष्टीने लाभदायक देखील ठरते.

दरम्यान, अनेकांना असे वाटते की केळ खाल्ल्याने वजन वाढते; परंतु केळ हे योग्य पद्धतीने खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे देखील मिळतात. केळ खायची नेमकी वेळ कोणती आणि केळ खाऊन नक्की कोणते फायदे आरोग्याला मिळतात याबाबत नक्की जाणून घ्या.

पचनक्रियेस फायदेशीर!

केळीमध्ये फायबर भरपूर असते. जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मदत करते. याने पचन तंत्र योग्य पद्धतीने काम करते. तसेच, यात प्रोबायोटिक्सही भरपूर असते. जे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्याशिवाय केळी खाल्याने ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या सुद्धा कमी होते. पोट जास्त वेळ भरलेले राहते ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.

हृदयासाठी हेल्दी!

केळींमध्ये पोटॅशिअम आढळते, जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते. सोबतच फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करते. कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहिल्याने हृदयरोगांचा धोकाही कमी होतो.

ब्लड शुगर कंट्रोल होते!

केळींमध्ये भलेही शुगर असली तरी याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. हे काम लो ग्लायसेमिक इंडेक्सचे असते ज्यामुळे केळी खाल्ल्यावरही ब्लडमध्ये शुगर हळूहळू रिलीज होते. सोबतच यातील फायबरमुळेही ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते.

एनर्जी मिळते!

केळी खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळते. सोबतच यात नॅचरल शुगरही असते, ज्यातूनही शरीराला एनर्जी मिळते. या कारणानेच एक्सरसाईज करण्याआधी किंवा सकाळी नाश्त्यामध्ये केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. इतकेच नाही तर केळी खाल्ल्याने मूडही चांगला होतो.