मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या (Aamir khan) अप्रतिम अभिनयाचे सर्वांनाच वेड लागले आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट शेवटचा लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही, पण लोकांना त्याची कथा खूप आवडली. अशातच चाहते आता आमिर खानच्या पुढच्या सिनेमाची वाट पाहत असून त्याच्याच मुलाने म्हणजेच, जुनैद खान याने खुलासा केला आहे की, आमिर लवकरच निवृत्ती घेणार आहे. सध्या जूनैदने केलेल्या वक्तव्यामुळे खरंच आमिर सिनेमातून संन्यास घेणार का? अशा चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत.
जूनैदने केलेला नेमका खुलासा काय?
जुनैद खान एका मुलाखतीत खळबळजनक खुलासा करत म्हणाला की, त्याचे वडील आणि सुपरस्टार आमिर खान यांनी निवृत्तीचा विचार केला आहे. कारण, जेव्हा मी महाराजाचे शूटिंग संपवून मिसिंग लेडीजच्या सेटवर होतो तेव्हा ते म्हणाले होते की, मी निवृत्तीच्या टप्प्यातून जात आहे. तसेच त्यांनी मला प्रोडक्शन हाऊस सांभाळण्यास ही सांगितले आहे. दरम्यान, जेव्हा माझे वडील ‘रिटायरिंग’च्या टप्प्यातून जात होते, तेव्हा मी बॉलिवूड इंडस्ट्रीत प्रवेश केला. कारण त्यांना निर्मितीची चांगली समज होती. माझा असा विश्वास आहे की चित्रपट निर्मिती हे सर्वात कठीण काम आहे. पुढे त्यांनी सांगितले की,आमिर खानला आणि त्यांची पत्नी रीना दत्ता या दोघांनाही त्याच्या पहिल्या चित्रपटाची चिंता नव्हती. ते फार उत्सुक होते आणि खूश होते. त्यांना हा चित्रपट खूप आवडला, असे जूनैदने सांगितले.
या चित्रपटात दिसणार आहे आमिर खान!
आमिर खान यावर्षी ‘सीतारे जमीन पर’ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट २००७ मध्ये दिग्दर्शित केलेल्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटावर आधारित आहे. याचे दिग्दर्शन आर.एस प्रसन्ना आणि स्टार जेनेलिया डिसूझा करणार आहे.