आज शनिवारचा दिवस हा अनेक अर्थांनी खास असणार आहे. आज कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले असून जाणून घ्या तुमच्या राशित आज काय?
मेष : आज रोजगाराच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळण्याची शक्यता. उत्पन्न आणि खर्चात संतुलन थोड संतुलन बाळगा. भविष्यात आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, आज कुठल्यातरी नवीन नोकरीसाठी प्रयत्न कराल. कुठलेही निर्णय घेताना घाई करु नका, नुकसान होऊ शकते. लव्ह लाईफ चांगल्यापद्धतीने जगा.
वृषभ : व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होण्याची शक्यता. जुन्या मित्राचा सल्ला आज उपयोगी ठरेल. आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक व्यवसायात मुले मदत करतील. जोडीदाराकडून सहकार्य मिळण्याची शक्यता.
मिथुन : आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता. ऑफिसच्या कर्मचाऱ्यांकडून तणावाचा सामना सहन करावा लागू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुमच्या प्रियजनांकडून सहकार्य मिळू शकतो. मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला राहू शकतो.
कर्क : आज व्यवसायासाठी आव्हानात्मक दिवस असेल. ऑफिसमध्ये तुमच्या सल्ल्याची गरज भासू शकते. आईच्या बाजूने आर्थिक स्थितीत लाभ मिळण्याची शक्यता. लाइफ पार्टनरसाठी भेटवस्तू घ्या. दीर्घकाळापासून थांबलेले काम आज पूर्ण होतील अशी शक्यता.
सिंह : तुमच्या प्रयत्नांना यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास दृढ राहील. वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या. भावंडांच्या नात्यात गोडवा निर्माण होण्याची शक्यता.
कन्या : आज व्यावसायिक प्रतिष्ठेचा लाभ मिळण्याची शक्यता. शत्रूंची संख्या वाढू शकते. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक ताण आज वाढू शकतो. राजकारणाच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला असू शकतो. कामाच्या ठिकाणी काही अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता.
तूळ : आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी यश मिळू शकते. मुलांकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता. जुन्या मित्राची भेट होऊ शकते. त्यामुळे मनात आनंद होईल. कोणत्याही गोष्टीत आज नुकसान होणार नाही अशी शक्यता, त्यामुळे काळजी करु नका. आवडत्या व्यक्तीकडून भेटवस्तू मिळू शकते.
वृश्चिक : आज तुमचे मनोबल उंचावेल. कुटुंबात शुभ घटना होतील अशी शक्यता. घरासाठी आज तुमचे पैसे खर्च होऊ शकते. रखडलेल्या व्यावसायिक योजनेला आज बळ देखील मिळू शकते. सासरच्या लोकांकडून आज आनंद मिळेल. गुंतवणुकीतून संबंधित धावपळ करावी लागू शकते. मुलांच्या लग्नाचे निर्णय घाईने घेऊ नका.
धनु : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक स्पर्धेत आज मेहनत घ्यावी. कुटुंबातील वाद आज पुन्हा नव्याने निर्माण होण्याची शक्यता. पालकांच्या सल्ल्याने वादविवाद थांबवाल. नात्यात दूरावा येऊ शकतो. व्यवसायात गती मिळण्याची देखील शक्यता.
मकर : आज कला-साहित्य क्षेत्रात प्रयत्नांना यश प्राप्त होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित काही माहिती मिळू शकते. थोडा प्रवास करावा लागू शकतो. मात्र पैशाची देवाणघेवाण करण्याचा विचार करत असाल तर सावध राहा.
कुंभ : आज तुम्ही मुलांच्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडा. कलेशी संबंधित असणाऱ्यांना जास्त व्यस्त राहावे लागेल. कामात थकवा जाणवेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता. उत्पन्न आणि खर्चात संतुलन राखावे लागेल. नोकरी व्यवसायात वाद निर्माण होऊ शकतो.
मीन : आज उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळण्याची शक्यता. कुठेतरी अर्धवेळ काम करण्याचा विचार करत असाल तर वेळ मिळू शकतो. आज वडिलधाऱ्यांच्या मदतीने मालमत्तेत फायदा होण्याची शक्यता. डोळ्यांच्या समस्या उद्भवतील त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी.