मुंबईत ‘रामायण’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी १२ सेट्स; कधी होणार शूटिंगला सुरुवात?

मुंबई : नितेश तिवारीच्या ‘रामायण’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता या चित्रपटाचे दुसरे शूटिंग शेड्युल सुरू होणार असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. रणबीर कपूर ऑगस्टपासून दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटात रणबीर प्रभू रामाची भूमिका साकारत असून रणबीर सोबत सई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

या पौराणिक रामायण चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी मुंबईत १२ भव्य सेट तयार केले जात आहेत. जे ऑगस्टच्या मध्यापर्यंत तयार होतील आणि माहितीनुसार, सेट तयार होताच, रणबीर कपूर ऑगस्टच्या अखेरीस चित्रपटाचे दुसरे शूटिंग शेड्यूल सुरू करणार असल्याचे समजते. एका मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या शूटिंगसाठी ३५० दिवसांचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये कलाकारांचे वैयक्तिक दृश्य आणि इतर दृश्यांचा समावेश असणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अयोध्या मिथिला अशे हे दोन्ही सेट मुंबईत बांधले जातील, आणि हे सेट्स 3D स्वरूपात तयार केले जाणार असून, हे सर्व संच १५ ऑगस्ट पर्यंत तयार होणार आहेत.

या सिनेमात नेमके कोणते कलाकार झळकणार?

रणबीर कपूर आणि सई पल्लवी यांनी या चित्रपटात भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या भूमिका साकारल्या आहेत. कन्नड सुपरस्टार यश या चित्रपटात लंकेश रावणाची भूमिका साकारणार आहे, तर सनी देओल या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारणार आहे. लारा दत्ता शूर्पणखाच्या भूमिकेत बघायला मिळेल. अभिनेता कुणाल कपूरनेही हा चित्रपट साईन केला आहे, मात्र त्याला कोणती भूमिका देण्यात आली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.